google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी! मनोज जरांगे-पाटील सोलापूर जिल्हा दौऱ्यावर, मराठा आरक्षण संदर्भात संवाद साधणार; असा असेल दौरा.. मंगळवेढा, पंढरपूर

Breaking News

मोठी बातमी! मनोज जरांगे-पाटील सोलापूर जिल्हा दौऱ्यावर, मराठा आरक्षण संदर्भात संवाद साधणार; असा असेल दौरा.. मंगळवेढा, पंढरपूर

मोठी बातमी! मनोज जरांगे-पाटील सोलापूर जिल्हा दौऱ्यावर,


मराठा आरक्षण संदर्भात संवाद साधणार; असा असेल दौरा.. मंगळवेढा, पंढरपूर

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे-पाटील दि.५ आणि ६ ऑक्टोबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. समाज बांधवांनी या दौऱ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय जाधव यांनी केले.जाधव म्हणाले, 

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे, ही मनोज जरांगे-पाटील आणि असंख्य समाज बांधवांची मागणी आहे. मागणीसाठीच त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण केले.

१४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठी जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील राज्यभर दौरा करीत आहेत. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता त्यांचे सोलापुरात आगमन होईल. या दौऱ्यात समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत.

.. असा असेल दौरा

दि.५ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता सोलापुरात आगमन, साडेचार वाजता मंगळवेढा, सायंकाळी ६:३० वाजता पंढरपूर,

६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:०० वाजता कुईवाडी, सकाळी १०:३० वाजता बार्शी येथे गाठीभेटी होतील. यानंतर ते धाराशिवकडे रवाना होतील, असे जाधव यांनी सांगितले.

जुने संदर्भ घेऊन या

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणातून मिळावे, ही प्रमुख मागणी आहे. समाज बांधवांकडे काही जुन्या नोंदी असतील, जुने दाखले असतील अथवा ही भूमिका बळकट करण्यासाठी काही पुरावे असतील तर त्यांनी घेऊन यावेत. हे पुरावे जरांगे-पाटील यांच्याकडे सुपूर्द करावेत, असे आवाहन जाधव यांनी केले.

Post a Comment

0 Comments