google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संतापजनक ..पत्नीचे अश्लील व्हिडिओसह फोटो व्हायरल करण्याची धमकी सोलापूर जिल्ह्यातील घटना

Breaking News

संतापजनक ..पत्नीचे अश्लील व्हिडिओसह फोटो व्हायरल करण्याची धमकी सोलापूर जिल्ह्यातील घटना

संतापजनक ..पत्नीचे अश्लील व्हिडिओसह फोटो व्हायरल करण्याची धमकी सोलापूर जिल्ह्यातील घटना 


सोलापूर (प्रतिनिधी) पत्नी सासरी नांदत असताना सासरकडच्या मंडळींनी तुझ्या नवऱ्याला रेल्वेमध्ये नोकरी लावायचे आहे, त्याकरिता चार ते पाच लाख रुपये घेऊन ये तरच नांदायचे असे म्हणत 

शारीरिक व मानसिक त्रास देऊन जाचहाट केला. तसेच पत्नीचे अश्लील मेसेज फोटो व्हिडिओ स्टेटसवर ठेवून घटस्फोट देत नसल्यास तुझे अश्लील

 व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर वायरल करून तुझी बदनामी करतो, असे म्हणत दमदाटी करत पत्नीस मारहाण केली. ही घटना दि.२१ नोव्हेंबर २०१७ ते ११ जूलै २०२३ दरम्यान फिर्यादी यांच्या सासरी कुर्डूवाडी येथे घडली. 

याप्रकरणी आकांक्षा विश्वनाथ ऐदाळे (वय-३१,रा .देशमुख पाटील वस्ती जवळ, लक्ष्मी पेठ सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती विश्वनाथ उर्फ रवी ऐदाळे, सासरे अशोक ऐदाळे, 

सासू जयश्री ऐदाळे, नणंद स्वाती ऐदाळे, माधुरी बनसोडे (सर्व.रा. कुर्डूवाडी, ता.माढा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच विश्वनाथ याने एका महिलेची दुसरे लग्न केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments