ब्रेकिंग! गणेश मंडळांसाठी शिंदे सरकारचा सर्वात मोठा निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने गणेश मंडळांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवाचे आयोजन करणाऱ्या मंडळांना एकदाच ५ वर्षांसाठी परवानगी देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना शिंदेंनी दिल्या आहेत.
या निर्णयामुळे राज्यातील हजारो गणेश मंडळांना दिलासा मिळणार आहे. येत्या दिवसात सण-उत्सवाचा काळ आहे. दहीहंडी, गणेशोत्सव उत्साहाने आणि शांततेने साजरे करा. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
राज्यात गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूक निघणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, असे निर्देश शिंदे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत. दरम्यान, सोलापूरसह अन्य भागात गणेशोत्सव याची तयारी केली जात आहे.
0 Comments