भयंकर घटना..बायकोला गोळ्या घातल्या आणि नवराही अटॅकने मेला!
पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर पतीलाही अटॅक येऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री दहानंतर कळवा येथे कुंभारआळी परिसरात घडली आहे.
घटनेचे नेमके कारण काय याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिस शेजाऱ्यांकडून या कुटुंबाची माहिती घेत आहेत.
दिलीप यशवंत साळवी ( ५७)असे गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याने प्रथम आपली पत्नी प्रमिला दिलीप साळवी ( ५१) हिच्यावर २ गोळ्या झाडल्या. त्यानंतर
त्याला ह्दय विकाराचा झटका आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.कळव्यातील कुंभारआळी परिसरात यशवंत निवास येथे हे दाम्पत्य राहत होते.
या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे लग्न झाले आहे. ठाणे महापालिकेचे माजी
उपमहापौर गणेश साळवी यांचे दिलीप यशवंत साळवी हे मोठे बंधू होते. दिलीप साळवी हे व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक होते.
0 Comments