google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ... सुनेने केली ८० वर्षीय सासूची हत्या; चाकून केले वार

Breaking News

धक्कादायक ... सुनेने केली ८० वर्षीय सासूची हत्या; चाकून केले वार

 धक्कादायक ... सुनेने केली ८० वर्षीय सासूची हत्या; चाकून केले वार


नागपूर : सासूसुनेचे वाद हे समाजासाठी नवीन नाही व काही ना काही कारणावरून सासूसुनांमध्ये ‘तु तु मै मै’ होतच असते. मात्र एका सुनेने रागाच्या भरात थेट आपल्या ८० वर्षीय सासूवर चाकूने वार करत हत्याच केली.

राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे संभाजी चौकाजवळच्या परिसरात खळबळ उडाली होती.

ताराबाई शिखरवार (८०) असे मृतक महिलेचे नाव असून पूनम शिखरवार (३६) ही आरोपी सून आहे. आनंद शिखरवार यांचे संभाजी चौकापासून ऑरेंज स्ट्रीटकडे जाणाऱ्या मार्गावर गॅरेज आहे व मागेच त्यांचे घर आहे. 

त्यांच्या आई ताराबाई, पत्नी पूनम, ९ वर्षीय मुलगा व १३ वर्षीय मुलगी असे कुटुंब एकत्रित रहायचे. पूनम यांचे सासूशी फारशे पटत नव्हते. पूनम शीघ्रकोपी असून तिच्यावर डॉक्टरांचे उपचारदेखील सुरू होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास सासू व सून घरातच असताना लहान मुद्द्यावरून वाद झाला. 

रागात पूनमने घरातील चाकू घेतला व त्याने सासूवर वार केला. वर्मावरच वार बसल्याने ताराबाई यांचा मृत्यू झाला. आरडाओरड एकून आनंद घरात आले आणि आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

त्यांनी आईला तातडीने मेडिकलमध्ये नेले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात या प्रकाराची माहिती देण्यात आली. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. आरोपी पूनमला पोलिसांनी अटक केली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली

Post a Comment

0 Comments