सोलापूर विद्यापीठातील 42 संशोधकांना जागतिक मानांकन
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील 42 संशोधक व शिक्षकांना जागतिक ए. डी. सायंटिफिक इंडेक्स या संशोधन यादीत मानांकन प्राप्त झाल्याची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी दिली.अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील प्रा. मुरत आल्पर आणि
प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे आल्पर डॉजर सायंटिफिक इंडेक्स तयार केला आहे. त्यात जगातील 218 देशातील 22350 विद्यापीठातून व 256 विविध शाखांमधून जागतिक संशोधकांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. गौतम कांबळे,
डॉ. विकास घुटे, डॉ. रघुनाथ भोसले, डॉ. विनायक धुळप डॉ. राजीव मेंते, डॉ. अंजना लावंड, डॉ. विकास कडू, डॉ. मुकुंद माळी, डॉ. बाळकृष्ण लोखंडे, डॉ. सदानंद शृंगारे, डॉ. श्रीराम राऊत, डॉ. ज्योती माशाळे, डॉ. अशोक शिंदे, डॉ. उजमा बांगी, डॉ. मकरंद कुलकर्णी,
डॉ. दिगंबर झोंबाडे, डॉ. श्रीपाद सुरवसे, उमेश बाराचे, योगेश राजेंद्र, डॉ. विपुल प्रक्षाळे, महेश अमलवार, दर्शन रुईकर, परशुराम कांबळे, टी. एच. मुजावर, व्ही. डी. बचुवार, मेघना कसबे, अमोल वीर, अमृता जगताप, मधुसूदन बचुटे, श्रीपाद मंतेन, दत्तात्रय सावंत, शिरीष मुळे, रवी मस्के, अमोल काळे, दादासाहेब गोडसे,
किरण फाळके, भागवत कौलवार, आनंद चव्हाण, तेजस काडगावकर, सुगंधराज कुलकर्णी, अमोल गजधाने या 42 संशोधक व प्राध्यापकांना जागतिक मानांकन प्राप्त झाले आहे. त्यांनी केलेल्या संशोधन कार्याची दखल घेऊन जागतिक संशोधन क्रमवारीत त्यांना हे यश प्राप्त झाले आहे.
0 Comments