google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संतापजनक घटना .. भल्या पहाटे झोपेतच पत्नीचा मर्डर

Breaking News

संतापजनक घटना .. भल्या पहाटे झोपेतच पत्नीचा मर्डर

संतापजनक घटना .. भल्या पहाटे झोपेतच पत्नीचा मर्डर


राज्यात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. नाशिक जिल्ह्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. पतीने बायकोची झोपेतच निर्घृणपणे हत्या केली.

 त्यानंतही स्वत: देखील गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. बुधवारी पहाटेच्या सुमारास आडगाव परिसरातील इच्छानगरमध्ये ही घटना घडली.

 विशाल निवृत्ती घोरपडे आणि धनश्री उर्फ प्रिती विशाल घोरपडे अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

 विशालने इतके टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही. 

विशालने प्रितीची हत्या करुन स्वत: गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, विशाल आपली बायको प्रिती हिच्यासह नाशिक शहरातील आडगाव परिसरातल्या इच्छानगर येथे राहत होता. काल रात्री किरकोळ कारणावरुन त्यांच्यात जबरदस्त वाद झाला होता. 

दरम्यान, प्रिती गाढ झोपेत असताना विशालने आज पहाटेच्या सुमारास तिची हत्या केली. विशालने प्रिती झोपेत असताना घरातील मुसळीने तिच्या डोक्यात सपासप वार केले. या घटनेत प्रितीचा जागीच मृत्यू झाला. प्रितीच्या हत्येनंतर विशालने घरातच गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती शेजारच्यांनी पोलिसांना दिली.

Post a Comment

0 Comments