google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला अवैध वाळू उत्खनन प्रकरणी तीन महिन्यात कारवाईचा धडाका तहसीलदारांनी ठोठावला २८ कोटींचा दंड

Breaking News

सांगोला अवैध वाळू उत्खनन प्रकरणी तीन महिन्यात कारवाईचा धडाका तहसीलदारांनी ठोठावला २८ कोटींचा दंड

 सांगोला अवैध वाळू उत्खनन प्रकरणी तीन महिन्यात कारवाईचा धडाका


तहसीलदारांनी ठोठावला २८ कोटींचा दंड

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे)

सांगोला  -वडील शिपाई राहिलेल्या तहसील कार्यालयात मुलाने तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तीन महिन्यातच तब्बल २८ कोटी २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तहसीलदार संजय खडतरे यांनी या तीन महिन्यात शासकीय परवाना न घेता, 

आणि रॉयल्टीची रक्कम बुडवून अवैध गौण खनिज उपसा केल्याप्रकरणी १९ जणांवर कारवाई करून दंडाची नोटीस बजावली.तहसीलदार संजय खडतरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गौण खनिज उपसाप्रकरणी मोठी कारवाई केली आहे.

 कोपटेवस्ती येथील पप्पू इंगोले व इतर चौघांवर अवैधरीत्या पाच हजार ब्रास वाळू उत्खनन केल्याप्रकरणी १७ लाख ८० हजार ५५० रुपयांचा दंड ठोठावला. वासूद येथील दीपक केदार व सचिन केदार यांनी अवैधरीत्या ९०० ब्रास वाळू उत्खनन केल्याप्रकरणी ३ कोटी २० लाख ४० हजार ५५० रुपयांचा दंड ठोठावला.

खारवटवाडी येथील संतोष सुरवसे यांनी येथील एक ब्रास वाळू उत्खनन केल्याप्रकरणी १ लाख ३६ हजार १५० रुपयाचा दंड ठोठावला. वासूद येथील सचिन केदार यांनी एक हजार ५० ब्रास वाळू उत्खनन

 केल्याप्रकरणी ३ कोटी ७३ लाख ८० हजार ५५० रुपयांचा दंड ठोठावला. अनकढाळ येथील आबा काटे यांनी अवैधरीत्या पाच ब्रास वाळूचा साठा केल्याप्रकरणी १ लाख ७८ हजार ५५० रुपयांचा दंड ठोठावला.

भारत माळी (रा. सांगोला) यांनी अवैधरीत्या वीस ब्रास वाळूचा साठा केल्याप्रकरणी ७ लाख १२ हजार ५५० रुपयाचा दंड ठोठावला. चिकमहुद येथील विजय मोरे यांचा अवैधरित्या दगड वाहतूक करणारा टिपर जप्त करून २ लाख ४२ हजार ९५० रुपयांचा दंड ठोठावला.

 मांजरी येथील अशोक शिनगारे यांनी १११ ब्रास वाळू उत्खनन केल्याप्रकरणी ३९ लाख ५२ हजार १५० रुपयांचा दंड ठोठावला. सुरेश गवंड (रा. आगलावेवाडी) यांनी एक ब्रास वाळू उत्खनन केल्याप्रकरणी १ लाख ३६ हजार १५० रुपयांचा दंड ठोठावला.

कोपटे वस्ती येथील संकेत देशमुख यांनी एक ब्रास वाळू उत्खनन केल्याप्रकरणी १ लाख ३६ हजार १५० रुपयांचा दंड ठोठावला. सावे येथील हिम्मत इमडे व इतर सहा जणांनी ६५ ब्रास वाळू उत्खनन केल्याप्रकरणी २३ लाख १४ हजार ५५० रुपयांचा दंड ठोठावला.

नवी लोटेवाडी येथील अमोल सावंत यांनी एक ब्रास वाळू उत्खनन केल्याप्रकरणी १ लाख ३६ हजार १५० रुपयांचा दंड ठोठावला. सावे येथील अण्णा खांडेकर यांनी ५३ ब्रास वाळू उत्खनन केल्याप्रकरणी १८ लाख ८७ हजार ३५० रुपयांचा दंड ठोठावला. 

चिणके येथील अमरसिंह मिसाळ यांनी १०७ ब्रास वाळू उत्खनन केल्याप्रकरणी ३८ लाख ०९ हजार ७५० रुपयांचा दंड ठोठावला. अनकढाळ येथील सूर्यकांत यादव यांनी ३०० ब्रास वाळू उत्खनन केल्याप्रकरणी ३१ लाख ८० हजार ५५० रुपयांचा दंड ठोठावला.

उत्तम पांढरे (रा. कारंडेवाडी) यांनी ४०० ब्रास वाळू उत्खनन केल्याप्रकरणी १ कोटी ४२ लाख ४० हजार ५५० रुपयांचा दंड ठोठावला. अतुल पाटील (रा. सोनंद) यांनी जेसीबीच्या साहाय्याने एक ब्रास वाळू उत्खनन केल्याप्रकरणी ७ लाख ८६ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

वाढेगाव येथील विजय हजारे यांनी टिपर मधून चार ब्रास वाळू उत्खनन केल्याप्रकरणी ३ लाख ४२ हजार ९५० रुपयांचा दंड ठोठावला. आगलावेवाडी येथील चंद्रकांत गवंड व इतर एकाने एक ब्रास वाळू उत्खनन केल्याप्रकरणी १ लाख ३६ हजार १५० रुपयांचा दंड ठोठावला

धायटी येथील राजेंद्र भोसले यांनी ५२ ब्रास मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी ५ लाख ५१ हजार ७५० रुपयांचा दंड ठोठावला. राजुरी येथील महादेव बाड यांनी दीड हजार ब्रास माती उत्खनन केल्याप्रकरणी १८ लाख ७ हजार ५५० रुपयांचा दंड ठोठावला आहे. अशा २१ जणांनी वाळू, मुरूम, माती व दगड विनापरवाना उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार संजय खडतरे यांनी २८ कोटी २० लाख ६२ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Post a Comment

0 Comments