सांगोला शहरावर पाणी टंचाईचे संकट सांगोलेकरांनो, पाणी जपून वापरा!
मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे )
सांगोला (प्रतिनिधी) :- सांगोला शहरास पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पंढरपूर येथील भीमा नदीपात्रातील पाणी पातळी पुर्णत: कमी झाल्याने शहरास २ दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याने दिनांक १/ ०९/२०२३ पासून पाण्याच्या उपलब्धतेनुसार शहरास ४ दिवसाआड वेळी अवेळी कमी वेळ कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एक दिवस आड येणारे पाणी आता चार दिवसानंतर येणारअसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे. या पूर्वी एक दिवस आड पाणी मिळत असल्यामुळे सुखावलेल्या नागरिकांना मात्र हा आठवडा त्रासदायक गेला. पाण्यासाठी अक्षरशः दाहीदिशा करण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे शहर व परिसरातील सर्वानी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.
0 Comments