google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग! सोलापुरात पुन्हा जड वाहतुकीचे चार बळी

Breaking News

ब्रेकिंग! सोलापुरात पुन्हा जड वाहतुकीचे चार बळी

 ब्रेकिंग! सोलापुरात पुन्हा जड वाहतुकीचे चार बळी


दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (आ.) गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरील बस स्टॉपवर सिमेंट वाहतूक करणारा

 बल्कर अचानक पलटी होऊन झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार झाले असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. 

याबाबत अशी माहिती की, शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास सिमेंट वाहतूक करणारी बल्कर सोलापूरकडे जात असताना या वळणावर वाहनचालकाचा ताबा सुटल्याने बल्कर बसस्टॉपवर जाऊन जोरात आदळली

 आणि पलटी झाली. यामध्ये बल्करखाली चेंगरून औज गावातील विठ्ठल शिंगाडे (वय 6६०), शालेय विद्यार्थी प्रज्ञा दोडतले (वय वर्षे १२), महेश इंगळे अंदाजे (वय १६,) अनिल चौधरी (वय वर्षे ५० यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

 ग्रामस्थांनी त्या ठिकाणी रास्ता रोको केला असून सिमेंटच्या वाहनांना एवढ्या मोठ्या प्रमाणात सिमेंट वाहतूक करण्यासाठी आरटीओ परवानगी कसा देतो? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे

 घटनास्थळी वातावरण तणावपूर्ण बनले. सदर घटनेची माहिती मिळताच तत्काळ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आपल्या यंत्रणेला तात्काळ घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सूचना केल्या आहेत.

 दुपारी एकच्या दरम्यान घडली असून सिमेंटचे बल्कर अतिशय वजनदार असल्याने दोन क्रेन मागून गाडी बाजूला करण्यात आली त्यानंतर गाडीखाली चिरडलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. तत्काळ ॲम्बुलन्सद्वारे सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले.

Post a Comment

0 Comments