google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार..संसाराची सुरूवात होण्यापुर्वीच दुर्देवी शेवट ; रिक्षा विहिरीत पडल्याने नवदांम्पत्यासह तिघांचा मृत्यू

Breaking News

धक्कादायक प्रकार..संसाराची सुरूवात होण्यापुर्वीच दुर्देवी शेवट ; रिक्षा विहिरीत पडल्याने नवदांम्पत्यासह तिघांचा मृत्यू

धक्कादायक प्रकार..संसाराची सुरूवात होण्यापुर्वीच दुर्देवी शेवट ;


रिक्षा विहिरीत पडल्याने नवदांम्पत्यासह तिघांचा मृत्यू

राज्यात वाढत्या अपघाताच्या प्रमाणामुळे चिंतेचा विषय बनला आहे. दररोज अपघाताचे प्रमाण वाढत असून यात अनेकांना जीव गमवावा लागतोय. दरम्यान, अशातच एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील सासवड – जेजुरी पालखी महामार्गावर खळद बोरावके मळा येथे रिक्षा विहरीत पडल्याची घटना समोर आली. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. दुर्देवी बाब म्हणजे मृतांमध्ये दोन दिवसापूर्वी लग्न झालेल्या एका नवविवाहित दांम्पत्याचाही समावेश आहे.

ही घटना सोमवार ( २५, सप्टेंबर) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे सांगितलं जात आहे. सकाळी व्यायामाला आलेल्या तरुणांना विहिरीतून वाचवा, वाचवा असा आवाज आला. 

यावेळी त्यांनी विहिरीत पाहिले असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती तात्काळ सासवड पोलिसांना देवून रिक्षासह दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट विहिरीत कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात मृतांमध्ये दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवदांपत्याचाही समावेश आहे. 

संसाराची सुरूवात होण्यापुर्वीच असा दुर्देवी शेवट झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments