google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यस्तरीय पावर लिफ्टींग स्पर्धेत सांगोल्याच्या विष्णू सरगर यांनी मिळविले गोल्ड मेडल वयाच्या 72 व्या वर्षी मिळविले गोल्ड मेडल राष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धेसाठी निवड

Breaking News

राज्यस्तरीय पावर लिफ्टींग स्पर्धेत सांगोल्याच्या विष्णू सरगर यांनी मिळविले गोल्ड मेडल वयाच्या 72 व्या वर्षी मिळविले गोल्ड मेडल राष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धेसाठी निवड

 राज्यस्तरीय पावर लिफ्टींग स्पर्धेत सांगोल्याच्या विष्णू सरगर यांनी मिळविले


गोल्ड मेडल वयाच्या 72 व्या वर्षी मिळविले गोल्ड मेडल राष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धेसाठी निवड

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे)

सांगोला  (प्रतिनिधी): पुणे जिल्हा पावर लिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेमध्ये उदनवाडी गावचे सुपुत्र विष्णू सरगर यांनी  राज्य पावर लिफ्टिंग स्पर्धेतील बेंच प्रेस या प्रकारात मास्टर फोर सीनियर सिटीजन गटामध्ये 93 किलो गटात 67.500 किलो उचलून गोल्ड मेडल प्राप्त केले. 22 ते 26 नोव्हेंबर 2023 रोजी बेंगलोर कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे.

यापूर्वीही यांनी अनेक स्पर्धेत त्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे विष्णू सरगर यांचे वय 72 वर्ष असूनही दरवर्षी ते राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवून मेडल प्राप्त करतात.

 सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने त्याचबरोबर सांगोला तालुक्याच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग संघटनेचे जन. सेक्रेटरी  सरदेसाई सर, संजय माधव, मुंबई अरुण पाटकर रायगड,  न्यू इंग्लिश जुनियर कॉलेजचे माजी शारीरिक शिक्षक वसंतराव शिंदे, 

कै.गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला चे शारीरिक शिक्षक विजय पवार, सांगोला महाविद्यालय सांगोला चे प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, सोलापूर जिल्हा पावर लिफ्टिंग संघटनेचे सचिव प्रा.संतोष गवळी यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments