धक्कादायक घटना... कौटुंबिक वादात जावयाने
झोपेत असलेल्या सासू व गरोदर पत्नीची पहारीने वार करून हत्या
अहमदनगर - जिल्ह्यातील राहुरी येथे कौटुंबिक वादात जावयाने झोपेत असलेल्या सासू व गरोदर पत्नीची पहारीने वार करून हत्या केली, या हत्येनंतर स्वतः जावयाने आत्महत्या केली.
राहुरी तालुक्यातील कात्रड भागात मंगळवारी मध्यरात्री गरोदर पत्नी 23 वर्षीय नूतन सागर साबळे व सासू 45 वर्षीय सुरेखा दिलीप दांगट हे झोपेत असताना 27 वर्षीय जावई सागर सुरेश साबळे यांनी दोघांवर पहारीने वार केला, या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर बुधवारी दुपारच्या सुमारास सागर साबळे यांनी धनगरवाडी शिवारातील गळफास घेत आत्महत्या केली.
लग्नानंतर सागर हा सासुरवाडीत राहत होता, नगर मधील midc मध्ये सागर कामाला होता, मात्र दररोज त्याचे सासू व पत्नीसोबत वाद सुरू होता, सदर कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते, मात्र तिघांचा वाद काही मिटत नव्हता.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सागर ने झोपेत असलेल्या सासू व पत्नीवर पहारीने डोक्यावर वार करीत हत्या केली, त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला.
हत्येच्या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आरोपी सागर साबळे याला अटक करण्यासाठी पथक तयार केले, मात्र दुसऱ्यादिवशी सागर चा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.



0 Comments