google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूरच्या नेत्यांना झालंय तरी काय? काल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आज भाजपत हमरीतुमरी

Breaking News

सोलापूरच्या नेत्यांना झालंय तरी काय? काल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आज भाजपत हमरीतुमरी

 सोलापूरच्या नेत्यांना झालंय तरी काय? काल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी,


आज भाजपत हमरीतुमरी

सोलापूरच्या काँग्रेस भवनात रविवारी (ता. २० ऑगस्ट) दोन कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली होती, तर आज (ता. २१ ऑगस्ट) भारतीय जनता पक्षाच्या नेता आणि कार्यकर्त्यामध्ये हमरीतुमरी झाली.

सलग दोन दिवस घडलेल्या या घटनांमुळे सोलापूरच्या राजकीय नेत्यांना झालंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापूरच्या काँग्रेस भवनात आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर बहुतांश कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे यांच्यासोबत फोटो काढला. मात्र, त्या गर्दी प्रणिती शिंदे यांच्यासोबत फोटो काढता आली नाही, या रागातून काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली होती.

आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेस भवनातून निघून गेल्यानंतर हा प्रकार घडला. ते सर्वजण पायऱ्या उतरत असतानाच दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर हाणामारी झाली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दोघांना आवरल्याने त्यामुळे वाद मिटला. मात्र, हाणमारीचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होऊन पक्षाची छी थू व्हायची ती झालीच.

दरम्यान, गैरसमजातून दोघांमध्ये किरकोळ शाब्दीक बाचाबाची झाली. दोघांची समजूत घालून गळाभेट घडवून आणली आहे. दोघांमध्ये आता कोणताही वाद राहिलेला नाही, असे काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितले.

काँग्रेस भवनात घडलेल्या हाणमारीमुळे शहरात पक्षाची नाचक्की झाली. तो प्रकार ताजा असतानाच आज सोलापुरात भाजपमध्येही अंतर्गत वादातून हमरीतुमरी झाली. भाजपचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी मध्यस्थी करत तो वाद मिटवला. त्यामुळे सोलापुरातील राजकीय क्षेत्रात सलग दोन दिवस हाणामारी आणि हमरीतुमरीच्या घटना घडल्या आहेत.

नागपंचमीनिमित्त आयोजित पुजेच्या कार्यक्रमात भाजप नेत्यांमध्ये हमरीतुमरी झाली. त्या कार्यक्रमाला खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे उशिरा आले. त्यावेळी फोटो काढण्यावरून भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये हमरीतुमरी झाली. सोलापूरच्या राजकारणातील चकमक ही चिंता करण्यासारखी आहे.


Post a Comment

0 Comments