google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुर्दैवी घटना! ऑन ड्युटी असणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा रूग्णालयात कोसळून मृत्यू

Breaking News

दुर्दैवी घटना! ऑन ड्युटी असणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा रूग्णालयात कोसळून मृत्यू

 दुर्दैवी घटना! ऑन ड्युटी असणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा रूग्णालयात कोसळून मृत्यू


आरोग्य खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी शिरोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्य बाजावत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी अक्षया पावसकर यांचा रूग्णालयात कोसळून मृत्यू झाला. पावसकर रूग्णालयात अचानक खाली पडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

अक्षया 38 वर्षांच्या होत्या. तरूण वैद्यकीय अधिकाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी शोक व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षया पावसकर रूग्णालयात कर्तव्य बजावत असताना, त्या अचनाक कोसळल्या. दरम्यान, याचवेळी त्यांचा मृत्यू झाला. अक्षया यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, शवविच्छेदनानंतर नक्की कारण समोर येईल असे सांगितले जात आहे.

मृत्यूच्या कारणाचा शोध घेणार

राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना या दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच, महिला डॉक्टरचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा देखील विभागामार्फत शोध घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments