सांगोल्रायात ज्यस्तरीय भजन स्पर्धा,स्मृतीग्रंथ प्रकाशन आणि इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन व अन्य कार्यक्रम
भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील साळुंखे पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिम्मित जवळा येथे विविध कार्यक्रम
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)
सांगोला : प्रतिनिधी सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पत्नी आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील
यांच्या मातोश्री भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान जवळा ता सांगोला येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सबंध आयुष्यभर पंढरीच्या पांडुरंगाची मनोभावे सेवा करणाऱ्या भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांचे आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान होते. दरवर्षी त्या पंढरीला पायी वारी करत होत्या.
अध्यात्मिक परंपरा जपलेल्या स्व. काकींच्या प्रथम पुण्यतिथीनिम्मित भरगच्च अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
रविवार दि ३ रोजी स ९ ते दु ४ पर्यंत श्री नारायण मंदिर येथे राज्यस्तरीय भजन स्पर्धा तर सोमवार दि ४ रोजी स १० ते दु १२ वा ह.भ.प. जयवंत बोधले महाराज यांचे कीर्तन दु १२ वा भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी तरी
दु १२.२० ला भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मृतीग्रंथांचे प्रकाशन आणि आदर्श माता व आदर्श कन्या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
सोमवार ४ रोजीचे सर्व कार्यक्रम नारायण मंदिर जवळा येथे होतील तर मंगळवार दि ५ रोजी जि. प. शाळा न १ येथे स ९ ते दु ३ पर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
तर सायं ५ ते ८ या वेळेत घेरडी रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ , जवळा येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
भगवतभक्त शारदादेवी (काकी) साळुंखे पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमास जवळा पंचक्रोशीतील आणि संपूर्ण सांगोला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
असे आवाहन आयोजक भगवतभक्त वैकुंठवासी शारदादेवी (काकी) बापूसाहेब साळुंखे पाटील पुण्यस्मरण समिती, सांगोला यांच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments