google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...बाईकवरुन सहा ते सात जण आले, भाजी विक्रेत्याला संपवले भरबाजारपेठेत भाजी विक्रेत्याचा सपासप वार करून खून, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

Breaking News

खळबळजनक घटना...बाईकवरुन सहा ते सात जण आले, भाजी विक्रेत्याला संपवले भरबाजारपेठेत भाजी विक्रेत्याचा सपासप वार करून खून, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

खळबळजनक घटना...बाईकवरुन सहा ते सात जण आले, भाजी विक्रेत्याला संपवले


भरबाजारपेठेत भाजी विक्रेत्याचा सपासप वार करून खून, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नसल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी टोळक्याच्या मारहाणीत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला काही दिवस होत नाही तोच नाशिकमधील सिडको परिसरात 4 ते 5 अज्ञातांनी एका भाजी विक्रेत्यांची भरदिवसा हत्या केल्याची घटना गुरुवारी घडलीय. 

भाजी विक्रेत्यावर धारधार शस्त्रानं हल्ला झाल्यानं नाशिक शहर पुन्हा हादरलंय. या प्रकरणात पोलिसांनी चार तासात तीन संशयितांना ताब्यात घेतलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, सिडको भागात असलेल्या लेखानगरमधील शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथे ही घटना घडलीय. संदीप आठवले (22 वर्षे) खून झालेल्या भाजी विक्रेत्याचं नाव आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्यानं संदीपवर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. संदीपच्या छातीत, पोटात, मानेवर तब्बल 30 पेक्षा अधिकवेळा वार करण्यात आले. 

संदीपवर हल्ला करुन हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान या हल्ल्यात संदीपचा जागीच मृत्यू झाला. संदीपची हत्या का करण्यात आली याचे कारण अजून समजलेले नाही. नाशिक पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून संदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवलाय.

संदीपवर हल्ला करण्यात आल्याची घटना एका दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झालीय. पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या आधारेच आरोपींचा शोध घेत 3 संशयितांना अटक केलीय. हल्ला करणारे संशयित हे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून त्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे. 

संदीपचा खून झाला तेथून हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे. मात्र तेथे कोणीच नसते, असं नागरिकांनी सांगितलं. या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी,अशी मागणीही नागरिकांनी केलीय.

बाईकवरुन सहा ते सात जण आले, भाजी विक्रेत्याला संपवले

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आठवडाभरा पूर्वी नाशिक शहरातील अंबड परिसरात एका युवकाची हत्या झाल्याची घटना घडली होती. या हत्येच्या घटनेला आठ दिवस होत नाही तोवरच पुन्हा एकदा नाशिक शहरातील 

शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथील एक भाजी विक्रेत्यावर अज्ञात सहा ते सात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. संदीप आठवले (२२) असे हत्या केलेल्या भाजी विक्रेत्याचे नाव असून त्याच्यावर अज्ञात सहा ते सात व्यक्तींनी धारदार शस्त्राने २५ पेक्षा जास्त वार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments