google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी ..सोलापुरात भाजपला मोठं खिंडार; पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Breaking News

मोठी बातमी ..सोलापुरात भाजपला मोठं खिंडार; पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

मोठी बातमी ..सोलापुरात भाजपला मोठं खिंडार; पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे


सोलापूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. बीआरएसनं सोलापुरात भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजप अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले असून, 

ते आता बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सोलापूरचा दौरा केला होता. 

या दौऱ्यात त्यांनी पंढरपुरात जोरदार शक्तिप्रदर्श केल्यानं त्यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत आला. आता त्यांनी सोलापुरात भाजपला मोठा धक्का दिला आहे.भाजपा अल्पसंख्याक आघाडीच्या 25 पदाधिकाऱ्यांनी आपल्या सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिला आहे.

 आता हे सर्व पदाधिकारी आज सकाळी 11 वाजता बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. हे पदाधिकारी शनिवारी रात्रीच हैदराबादला रवाना झाले असून, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. आगामी विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सोलापुरात जोरदार शक्तिप्रदर्श बीआरएस पक्षानं आता महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. के. चंद्रशेखर राव यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या सर्व मंत्रिमंडळासोबत सोलापुरचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी जिल्ह्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. 

के. चंद्रशेखर राव यांच्या सोलापूर दौऱ्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असणारे पण पक्षाकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी असणाऱ्या अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. बीआरएसकडून राज्यातील सर्व आगामी निवडणुका लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments