सांगोल्याचे रत्न तहसीलदार संजय खडतरे गोरगरीब जनतेचे सेवक म्हणून नावलौकिक मिळवला
(समता नगरी न्यूज नेटवर्क सांगोला)
सांगोला तहसीलदार पदी संजय खडतरे यांची नियुक्ती झाल्यानंतर वास्तविक महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन केलेला एक सन्मानच आहे. तहसीलदार संजय खडतरे मूळचे सांगोलाचे त्यांचे वडील याच कचेरीत शिपाई होते.
उभी हयातकचेरीत काढत असताना आपला मुलगा देखील साहेब व्हावा ही भावना वडिलांच्या मनात आली आणि मुलगा संजय यांनी देखील वडिलांचे कष्ट सार्थ ठरवले. सांगोल्याचे तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर गोरगरीब जनतेचे सेवक म्हणून तहसीलदार संजय खडतरे नावाजले जात आहेत
ज्या ज्या ठिकाणी सेवा बजावली तेथे छाप पाडली. गोर गरीब, अडले नाडल्याच्या मदतीला जात कामाचा झपाटा ठेवला. त्यांच्या कामाची लकब आणि झटपट निर्णय यामुळे लोकांमधील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून संजय खडतरे यांची ओळख बनली. -
कर्तव्यनिष्ठ तहसीलदार संजय खडतरे यांची सांगोला तहसीलदार पदीनियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या कामाचा झपाटा आणखी वाढवला. वय वृद्ध नागरिक पेन्शन बंद झालेले लोकांना नियमा प्रमाणे पेन्शन सुरू व्हावी तसेच पी एम किसान योजना पेन्शन मिळाले नाही
या लोकांसाठी स्वतंत्र यंत्रणा राबवून कचेरीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे निरसन व्हावे, त्यांची कामे व्हावीत यावर जोर धरला. यामुळे त्यांच्या प्रती सामान्य नागरिकांमध्ये आणखी आदर वाढला. अगदी कचेरी सोडून इतर काही अडचणी आल्या
तरी नागरिक हक्काचा माणूस म्हणून तहसीलदार संजय खडतरे यांच्याकडे. हक्काने जातात. सांगोला कचेरीतील सर्व प्रशासकीय यंत्रणेवर वाचक ठेवल्यामुळे यंत्रणा फास्ट कार्यरत आहे गोरगरिबाच्या कामाला प्राधान्य देण्यामुळे ग्रामीण भागातून जनतेतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


0 Comments