ब्रेकिंग न्यूज! कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात भूकंपाचे झटके
कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज सकाळी 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता.
कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले. कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले.
यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह लगतच्या गावांमध्ये भूकंपाचे झटके जाणवले. या भूकंपामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. दरम्यान गेल्याच महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूकंपाचे झटके जाणवले होते.


0 Comments