देवेंद्रजी फडणवीस यांनी 13 ऑगस्ट रोजी छावणी बीले देण्याची घोषणा करावी ….
प्रफुल्ल कदम यांची विशेष मागणी अन्यथा मंत्रालयावर फोन आंदोलन
कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यानंतर आता सांगोल्यात मोठा तांत्रिक घोटाळा उघड अनेक छावणी चालकांचा प्रफुल्ल कदम यांच्या आंदोलनाला पाठिंबा
सांगोला प्रतिनिधी (समता नगरी न्यूज नेटवर्क सांगोला)
चारा छावणी संदर्भातील भोंगळ व बेकायदेशीर कारभारामुळे महाराष्ट्र शासनाची व प्रशासकीय व्यवस्थेची लोकांमध्ये मोठी बदनामी होत आहे.या भोंगळ कारभारामुळे काही दोषी मंडळींना संरक्षण तर काही निर्दोष लोकांवर नाहक अन्याय होत आहे.
ही बदनामी थांबवण्यासाठी,दोषींवर कारवाई करण्यासाठी आणि निर्दोष लोकांवरील अन्याय दूर होण्यासाठी किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण व गंभीर मागण्या शासनाकडे सादर केल्या असून
2018-19 च्या चारा छावण्यांची बीले तत्काळ देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.13 ऑगस्ट रोजी करावी अशी मागणी प्रफुल्ल कदम यांनी शासनस्तरावर केली आहे.
सदर मागण्या मान्य नाही झाल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना मागण्या मान्य करेपर्यंत सतत फोन करण्याचे आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.त्यांच्या या मागणीस आणि या आंदोलनास चारा छावणी चालकांनीही पाठिंबा दिला आहे.


0 Comments