google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शेतकरी कामगार पक्षाचे भाई बाबासाहेब कारंडे यांनी दिला राज्यचिटणीस मंडळ पदाचा राजीनामा पक्षीय पदावर काम करणे शहाणपणाचे होणार नाही; राज्यचिटणीस मंडळ सदस्य पदाचा राजीनामा देणे योग्य : भाई बाबासाहेब कारंडे

Breaking News

शेतकरी कामगार पक्षाचे भाई बाबासाहेब कारंडे यांनी दिला राज्यचिटणीस मंडळ पदाचा राजीनामा पक्षीय पदावर काम करणे शहाणपणाचे होणार नाही; राज्यचिटणीस मंडळ सदस्य पदाचा राजीनामा देणे योग्य : भाई बाबासाहेब कारंडे

शेतकरी कामगार पक्षाचे भाई बाबासाहेब कारंडे यांनी दिला राज्यचिटणीस मंडळ पदाचा राजीनामा


पक्षीय पदावर काम करणे शहाणपणाचे होणार नाही; राज्यचिटणीस मंडळ सदस्य पदाचा राजीनामा देणे योग्य : भाई बाबासाहेब कारंडे

सांगोला /प्रतिनिधी :- शेतकरी कामगार पक्षीय पदावर काम करणे शहाणपणाचे होणार नाही, यामुळे राज्यचिटणीस मंडळ सदस्य पदाचा राजीनामा देणे योग्य राहील असे

सांगत राज्याची चिटणीस मंडळाचे सदस्य भाई बाबासाहेब कारंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा तालुका चिटणीस यांच्यामार्फत मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. यामुळे शेकाप

पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

सावे येथे संपन्न झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीची तालुक्यामध्ये खरी-खोटी बरीच चर्चा झाली. पक्ष हिताचा विचार करूनच

प्रत्युत्तर दिले नाही, याचा अर्थ आ मी मान्य केले असा होत नाही. विरोधी कोणाचेही नाव घेतले नसताना ऐकिव माहिती व विरोधी राजकीय डावपेचाचा विचार न करता माझ्यावर वर्तमानपत्रामधून व सोशल मीडियावर मानहानीकारक टीका झाली. 

काही हितचिंतकांनी पक्षातून सर्वांनाच काढून टाका आणि आम्ही स्वतःहून पक्षा बाहेर जावे असे न मागता सल्ला दिला. स्वतः आबासाहेब यांच्यासह कुटुंबावर आम्ही जीवापाड प्रेम केले. त्यांच्या कुटुंबाचे नाव वापरून आम्हास दगाबाज व गद्दार असे प्रमाणपत्र देण्यात आले. ही बैठक मी बोलावली

असा आरोप झाला हे खरे नसताना, सगळ्या प्रकरणाला मला जबाबदार धरण्यात आले. जी वाक्य बातमीमध्ये वापरली त्याची खरी वस्तूस्थिती समजून घेतली नाही.

 ही घटना पक्ष हिताची निश्चितच नाही. आमच्या मागे जनाधार नाही यांना स्वगावात किंमत नाही असे वर्णन सुद्धा झाले, आम्ही विस्टा खाऊन निष्ठेचे ढोंग करतोय हे सांगायला निष्ठावंत विसरले नाहीत. 

मी स्वतः सभा शास्त्राचे ३० वर्ष पालन करीत आलो. मग मी कोणावर वैयक्तिक टीका कशी करेल ज्यांचे नावावर मी टीका केली त्यांचा या घटनेची संबंध नसताना आम्ही त्यांचे

नाव घेतलेच नाही मग याची खात्री न करता सरळ सरळ मला एकट्याला आरोपी का केले. ज्यांची मी बदनामी केली असा आरोप झाला ते प्रमुख नेते आहेत. त्यांनी माहिती घेऊन आमच्या मानहानीवर आवर घालने आवश्यक होते. तसे होताना दिसले नाही. 

असो आमचे दुर्दैव, राजकीय सामाजिक चळवळीमध्ये मतभेद असू शकतात मन भिन्नता असू नये, या बातम्यांमध्ये असणारा राजकीय कुटीलडाव पक्ष कार्यकर्ते नेते यांना ओळखता आला नसावा असे समजून आमच्या दृष्टीने हा विषय

संपला आहे. शहानिशा न करता दादागिरीची भाषा वापरणे हे योग्य झाले नाही. डोक्यावर बंदूक ठेवून सहानुभूती मिळत नसते हे आम्ही सर्वांना लक्षात ठेवलं पाहिजे. मेलेल्यांना मरणाची भाषा करण्यापेक्षा शक्तिमान असणाऱ्यांसोबत दोन हात करणे योग्य आहे. झाले गेले विसरून जाऊन उर्वरित असणारे जीवन व्यतीत करणे शहाणपणाचे ठरेल असा मी निश्चय केला आहे. आता इतरांना दोष देण्यापेक्षा मी आत्मचिंतन करणे योग्य समजतो. आता हे वय विश्रांतीचे आहे. माझ्या हृदयावर २००४ व २०१५ अशी दोन वेळा शस्त्रक्रिया झाली आहे. माझ्यावर टीका होणे साहजिकच आहे. काहींनी मी पक्ष • सोडला समजून टीका केली तर काहींनी पक्ष सोडणार समजून टीका केली. 

नेमके हे अचानक असे कसे घडले याचा यथावकाश शोध घेता येईल. यशाचे श्रेय घेणारे अधिक असतात मात्र पराभवाची जबाबदारी कोण घेत नाही. पराभवास जबाबदार पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्याला धरले जाते.

 तसेच मला धरलं हरकत नाही. माझे सुद्धा चुकलेच, मी पक्षाचे प्रमुख नेते त्यांच्यावर टीका केली हा आरोप खरा असो वा खोटा त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणे माझे कर्तव्यच आहे. नेते कार्यकर्ते मला माफ करतील अशी अपेक्षा व्यक्त करताना, मी कोणावर नाव घेऊन टीकाच केली नाही. हे सुद्धा नमूद करतो.

अशा माझ्या बद्दल पक्षांमध्ये निर्माण झालेल्या अविश्वासाच्या वातावरणामध्ये पक्ष पदाधिकारी म्हणून काम करणे रास्त वाटत नाही. 

आणि मी पक्षाच्या काही गोपनीय व महत्त्वाच्या बैठकामध्ये भाग घेणे पक्ष हिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही. एकदा दगाबाज मला ठरवल्यानंतर मी स्वतः मध्ये बदल करून आपणा सर्वांचा पुन्हा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

परंतु परिश्रम करण्याची ती शारीरिक क्षमता माझ्यामध्ये शिल्लक राहिली नाही. म्हणून मी माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या राज्यचिटणीस मंडळ सदस्य पदाचा याच पत्राद्वारे राजीनामा देत आहे. राज्यस्तरावरचे पक्षाचे ते आज तरी माझे नेतेच आहेत.

 पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो, पक्षाने भरपूर दिले त्या प्रमाणात मी पक्षासाठी जास्ती काम करू शकलो नाही, याबद्दल क्षमस्व अशा आशयाचे शेतकरी कामगार पक्षाच्या राज्यचिटणीस मंडळाच्या पदाचा राजीनामा पत्र तालुका चिटणीस यांच्यामार्फ त मंजुरीसाठी भाई बाबासाहेब कारंडे यांनी पाठवले आहे. 

यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. निश्चितच यामुळे शेतकरी कामगार पक्षाला धक्का मानला जात आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका समोर असताना जबाबदार पदाच्या पदाधिकाऱ्याने राजीनामा देणे पक्षाला हानिकारक ठरणार आहे. असेही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमधून मोठी चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments