खळबळजनक ! सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील ठेकेदार काम
बंद आंदोलन करणार; नेमक्या काय आहेत मागण्या? संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काम केलेल्या ठेकेदारांची कामे करूनही चार वर्षा पासून बिले मिळत नसल्याने या व्यवसायावर अवलंबून असणारे मजूर व छोटे उद्योग यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी बाबुराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवेढा, सांगोला येथील ठेकेदारांच्या बैठकीत बिले तत्काळ मिळावीत. अन्यथा ९ ऑगस्ट पासून वरील दोन्ही तालुक्यातील ठेकेदार काम बंद आंदोलन करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ठेकेदार योगेश खटकाळे यांनी दिली.
सांगोला येथे सांगोला, मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काम करणाऱ्या ठेकेदारांची बैठक ३० जुलै रोजी बाबुराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
ठेकेदारांनी ५०, ५४, ०४, ०३ या हेडची तसेच एस आर. व एफ डी आरची रस्त्याची, पुलाची व बांधकामाची कामे केली असून सदरची कामे पूर्ण झाली आहेत.
परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून या केलेल्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत. यामुळे सर्व ठेकेदार कर्जबाजारी झाले आहेत. या उद्योगावर आधारित जिल्लामा साना निगा प्रधान मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे.
यामुळे ह्या कामाची बिले तात्काळ मिळणे आवश्यक आहे. या कामाची बिले मिळावीत म्हणून १ ऑगस्ट रोजी अधीक्षक अभियंता सोलापूर यांना सर्व ठेकेदारांच्या वतीने बिले मिळावीत म्हणून निवेदन देण्यात येणार आहे.
या कामाची बिले न मिळाल्यास ९ ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सांगोला मंगळवेढा पंढरपूर येथील सर्व ठेकेदाराने दिला असल्याची माहिती ठेकेदार योगेश खटकाळे यांनी दिली.
या बैठकीस बाळासाहेब एरंडे, चेतन गाढवे, क्रांतीलाल डुबल, अतुल पवार, एम. आर. गायकवाड, बाळासाहेब आसबे, मधुकर साळुंखे, बुवा बंडगर, तानाजी बागल, सचिन बागल, निलेश माने, डी.एस. राऊत, धनंजय पाटील, आकाश येडगे आदी उपस्थित होते


0 Comments