google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन

Breaking News

आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन

  आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन


सांगोला/प्रतिनिधी :(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेते आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दि. ३० जुलै २०२३ रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला येथे सकाळी ९ ते ११ यावेळेमध्ये सांगोला तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

या रंगभरण स्पर्धेसाठी पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी व सातवी ते दहावी असे तीन गट केले असून यातील तीनही गटातील पहिले बक्षीस सायकल, द्वितीय बक्षीस स्मार्टवॉच, तृतीय बक्षीस स्कूलबॅग व उत्तेजनार्थ बक्षीस जेवणाचा डबा व रंगपेटी असणार आहे. तसेच यामध्ये पहिली ते तिसरीच्या वयोगटासाठी प्रत्येकी सहभागी विद्यार्थ्यास आकर्षक भेट वस्तू दिली जाणार आहे.

या रंगभरण स्पर्धेचे बक्षीस वाटप हे गुरूवार दि. ३ ऑगस्ट रोजी सायं. ४ वाजता सांगोला विद्यामंदिर प्रशाला याठिकाणी हभप निवृत्ती महाराज इंदूरीकर यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाअगोदर करण्यात येणार आहे, असल्याची माहिती आनंदा माने अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने देण्यात आली.

या स्पर्धेसाठी नावनोंदणीची आवश्यकता नसून अधिक माहितीसाठी महादेव पारसे- 8698591010 यांच्याशी संपर्क साधावा

Post a Comment

0 Comments