धक्कादायक प्रकार ! गुंठाभरही जमीन नसतानाही कर्ज दिले;
धक्कादायक प्रकारामुळे ३०९ जणांचे सभासदत्व रद्द
विविध कार्यकारी सोसायटीचे कार्यक्षेत्र हे खेडभोसे गावापुरते मर्यादित असताना संचालक मंडळाने चक्क पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील तब्बल ११ गावांमधील सभासद सोसायटीला संलग्न करून घेण्याचा
धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याबाबत सहायक निबंधक पी. सी. दुरगुडे यांनी या कार्यक्षेत्राबाहेरील ३०९ लोकांचे सभासदत्व रद्द करण्याचा आदेश दिला आहे.
खेडभोसे (ता. पंढरपूर) येथील विविध कार्यकारी सोसायटी या संस्थेचे कार्यक्षेत्र हे खेडभोसे गावापुरते आहे. या सोसायटीची एकूण सभासदसंख्या १०२४ आहे.
सन २०१४ मध्ये तत्कालीन संचालक मंडळाने नियमबाह्यपणे खेडभाळवणी होती. पिराची कुरोली, पटवर्धन कुरोली, शेवते, पेहे, देवडे, भोसे, व्होळे, अजोती, पंढरपूर, सांगोला या ११ गावांतील तब्बल ३२५ लोकांना संस्थेचे सभासद करून घेतले.
या लोकांच्या नावे गावात एकही गुंठा जमीन नव्हती. विशेष म्हणजे या लोकांना संस्थेचे खावटी कर्जवाटपसुद्धा केले होते.
याबाबत पंढरपूरच्या सहायक निबंधक यांच्याकडे बाबूराव पवार, बंडू पवार, लक्ष्मण पवार आणि राजाराम जमदाडे यांनी तक्रार केली होती.
याबाबत सहायक निबंधक पी. सी. दुरगुडे यांनी या प्रकरणाची दोन्ही बाजूंकडून सुनावणी घेऊन सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ११ मधील तरतुदीनुसार ३०९ सभासद है संस्थेचे कायदेशीर सभासदत्वाची पात्रता धारण करीत नसल्यामुळे
खेडभोसे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सभासद म्हणून राहण्यास अपात्र असल्याचे घोषित केले. वयाबाबत संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २५ अ प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेशही दिले आहेत.
चौकशी करून दोषींवर कारवाई करा
सहकारी संस्थेच्या नियमानुसार ज्या व्यक्त्तीच्या नावावर जमीन नाही, त्याला खावटी कर्जवाटप करता येत नाही. मात्र खेडभोसे सोसायटीने बेकायदेशीरपणे सुमारे २४० लोकांना खावटी कर्जवाटप केले आहे.
या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार बाबूराव पवार, बंडू पवार, लक्ष्मण पवार आणि राजाराम जमदाडे यांनी सहायक निबंधक यांच्याकडे केली आहे.


0 Comments