google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वृत्तपत्र विक्रेत्यांना हवे स्वतंत्र मंडळ : मुख्यमंत्र्यांना साकडे संघटनेच्या वतीने सांगोला तहसीलदारांना निवेदन सादर

Breaking News

वृत्तपत्र विक्रेत्यांना हवे स्वतंत्र मंडळ : मुख्यमंत्र्यांना साकडे संघटनेच्या वतीने सांगोला तहसीलदारांना निवेदन सादर

 वृत्तपत्र विक्रेत्यांना हवे स्वतंत्र मंडळ : मुख्यमंत्र्यांना


साकडे संघटनेच्या वतीने सांगोला तहसीलदारांना निवेदन सादर

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

सांगोला :  वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणी व इतर प्रश्नांची सोडवणूक करावी,वृत्तपत्र विक्रेत्यांसह वृत्तपत्र व्यवस्थेतील सर्व घटकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करावे,या मागणीसाठी सांगोला तालुका वृत्तपत्र एजंट व विक्रेता संघटनेच्या वतीने अध्यक्ष रविराज शेटे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार संजय खडतरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 सदर निवेदनात म्हंटले आहे की,राज्यातील वृत्तपत्र विक्रेते हे संघटनेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षांपासून त्यांच्या विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा करीत आहेत.

७ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या व त्यांच्या संबंधित कल्याणकारी योजनेचा प्रस्ताव व अंमलबजावणी करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त व संघटित कामगार कार्यालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठीत करण्यात आली होती.

या समितीने तयार केलेला अहवाल १७ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्य शासनाला सादर करण्यात आलेला आहे.वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कामाचे स्वरूप हे इतर कामापेक्षा भिन्न असून त्यांच्यासाठी सुंदर कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यांना त्याचा लाभ दिला पाहिजे, अशी स्पष्ट शिफारस सदर अहवालामध्ये केली आहे. 

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यांचा निपटारा लवकरात लवकर करावा,अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा अध्यक्ष रविराज शेटे यांनी दिला आहे.

यावेळी, संघटनेचे उपाध्यक्ष अमोल बोत्रे,सचिव उत्तम चौगुले, 

वृत्तपत्र एजंट भानुदास जाधव,संतोष बनसोडे, दत्तात्रय पवार,विकास जावीर,रफिक पठाण,सिताराम गेजगे,महेश डोंगरे उपस्थित होते .

 या आहेत मागण्या :

१) वृत्तपत्र विक्रेत्यांसह वृत्तपत्र व्यवसायातील सर्वच कर्मचाऱ्यांसाठी एकत्रित स्वतंत्र कल्याणकारी मंडळ  कार्यान्वित करावे.

२) वृत्तपत्र विक्रेते व व्यवसायातील सर्वच कर्मचाऱ्यांची असंघटित कामगार म्हणून नोंद सुरू करावी.

३) आरोग्य,शैक्षणिक पेन्शन आदी योजना ताबडतोब लागू कराव्यात.

४) गटई कामगाराप्रमाणे मोक्याचे ठिकाणी पेपर स्टॉल उपलब्ध करून द्यावेत.

Post a Comment

0 Comments