उदनवाडी गावाला एस.टी. बसचा विनंती थांबा मंजूर ; मुंबईत राहून शाहरुख मुलाणी यांच्या प्रयत्नांना यश स्वातंत्र्यांनंतर
पहिल्यांदाच जलद गाडी उदनवाडी येथे थांबणार..!
सांगोला. (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)
उदनवाडी गावाचे सुपुत्र शाहरुख मुलाणी व प्रा. मुकुंद वलेकर यांना वारंवार महाविद्यालयीन विद्यार्थी - विद्यार्थीनींची तसेच उदनवाडी गावातील ग्रामस्थांकडून जलद बसेस चा थांबा होण्यासंदर्भात मागणी होत होती.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार प्राध्यापक मुकुंद वलेकर यांच्या साथीने रुग्ण हक्क परिषदचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांच्या विशेष प्रयत्नांनी उक्त विषय मार्गी लागला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यांनंतर पहिल्यांदाच उदनवाडी गावात जलद गाडी थांबणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे.
त्याअनुषंगाने उदनवाडी गावातील सर्व स्तरातून रुग्ण हक्क परिषदचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी व प्रा. मुकुंद वलेकर यांचे विशेष आभार मानले जात आहे. तसेच गावाच्या बाहेर राहूनही समाजसेवा करायची इच्छा असेल सर्व काही होऊ शकते हे यातून दिसून आले.
सर्व ग्रामस्थांना होत असलेल्या अडीअडचणी प्रशासन दरबारी मांडून सदैव गावाची सेवा शाहरुख मुलाणी व अरविंद वलेकर करतील असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले. त्याचबरोबर शाहरुख मुलाणी यांना कळत नकळत ज्यांनी कोणी या कार्यासाठी मदत केली त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले
तसेच भविष्यात ही कोणताही प्रश्न मी संकोचपणे सांगावा गावाचा सुपुत्र या नात्याने यावरती तोडगा काढण्याचा मी सदैव प्रयत्न करीन व मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी इच्छा देखील शाहरुख मुलाणी यांनी व्यक्त केले.
यावेळी मुलाणी म्हणाले की, मिरज, सांगली, पंढरपूर येथे दवाखान्याच्या निमित्ताने गावातील लोकांची रोज मोठ्या प्रमाणात ये- जा होते. तर, पंढरपूर हे तीर्थक्षेत्र हे उदनवाडी गावापासून 50 किलोमीटरवर असून वारकरी भाविकांची वर्षभर सतत ये-जा होत असते.
तसेच उदनवाडी गावाच्या पाठीवर 05 मोठ्या वाड्या आहेत. उदनवाडी येथे या अधिकृत बसथांबा नसल्यामुळे अबालवृद्ध प्रवाशांना व महिलांना प्रवासाच्या अनेक अडचणी येऊन त्रास होत आहे.
याअनुषंगाने उदनवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या विनंतीनुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातील साध्या, ग्रामीण व जलद (जवळ, मध्यम व लांबचा पल्ला) गाड्यांना उदनवाडी येथे अधिकृत विनंती थांबा मंजूर करून संबंधितांना योग्य ते आदेश देऊन सहकार्य करावे
अशी जोरदार मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे व एस. टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भाप्रसे शेखर चन्ने यांच्याकडे ईमेल द्वारे दि. 06 जुलै, 2023 रोजी निवेदन पाठवून केले होते.
व उदनवाडी ग्रामपंचायतीचा दि.07/07/2023 रोजीचा ठरावाचे पत्र संबंधित कार्यालयात देण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाव्यवस्थापक (वाहतुक), उप महाव्यवस्थापक (नियंत्रण व समिती क्र. 01) (मुंबई व पुणे) पुणे विभाग, पुणे, विभाग नियंत्रक,
सोलापूर विभाग, सोलापूर आणि आगार व्यवस्थापक सांगोला यांना देखील पत्र दिले आहे. त्यावर महाव्यवस्थापक (वाहतूक) यांच्याकडून आपला ई-मेल या कार्यालयास प्राप्त झाला आहे, आपणास झालेल्या असुविधेबद्दल आम्ही दिलगीर आहोत,
रा.प. महामंडळा प्रती आपण दाखवलेल्या आस्थे बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपण दिलेल्या निवेदनावर / तक्रारीवर लवकरच उचित कार्यर्वाही केली जाईल. त्याबद्दल आपणास कळविण्यात येईल, असे उत्तर देण्यात आले आहे होते.
तर मुख्यमंत्री सचिवालयाकडून आपला "ईमेल" मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला असून तो पुढील कार्यवाहीसाठी परिवहन व बंदरे- गृह विभाग यांना पाठविण्यात आला आहे, असे त्यांनी कळविले होते. त्यानंतर
सांगोला आगार व्यवस्थापक निसार नदाफ यांनी जा. क्र. राप/आव्य क/सां/वाह/421 रा.प सांगोला आगार दि. 13/07/2023 रोजी या पत्राद्वारे जलद गाड्यांना
विनंती थांबा करण्याचे राज्यातील काही विभाग नियंत्रक यांना कळविले आहे. त्यामुळे गावकऱ्यांची सोय होणार आहे, असे मुलाणी म्हणाले.


0 Comments