भयंकर घटना! जेवण केल्यानंतर ब्लेडनी स्वत:चं
गुप्तांग कापुन केली आत्महत्या ; कारण ऐकुण पोलिसही गोंधळले
भयंकर! जेवण केल्यानंतर ब्लेडनी स्वत:चं गुप्तांग सेकंदात कापुन केली आत्महत्या ; कारण ऐकुण पोलिसही गोंधळले तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात शिकत
असलेल्या २० वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. विद्यार्थी तणावाखाली होता आणि त्यानं काही दिवसांपूर्वीच औषधं बंद केली होती.
त्यानं स्वत:चं गुप्तांग धारदार वस्तूनं कापलं. त्यामुळे रक्तस्राव सुरू झाला. रक्त गेल्यानं त्याचा मृत्यू झाला. विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला. २० वर्षांचा दीक्षित रेड्डी रविवारी त्याच्या यादगिरीगुट्टामधील घरात बेशुद्धावस्थेत सापडला. त्याच्या गुप्तांगाला जखम होती. त्यातून रक्तस्राव सुरू होता.
त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दीक्षित रेड्डी त्याच्या आई आणि बहिणीसोबत राहायचा. हैदराबादच्या गांधी रुग्णालयात त्याचं शिक्षण सुरू होतं.
दीक्षितच्या आत्महत्येनं आणि त्यासाठी त्यानं वापरलेल्या मार्गामुळे त्याच्या मित्रांना जबर धक्का बसला आहे.दीक्षित रेड्डीनं चार वर्षांपूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी त्याचा जीव वाचला. दीक्षितच्या मित्रानं आत्महत्या केली होती. तेव्हापासून दीक्षित तणावाखाली होता.
तणावमुक्तीसाठी तो औषधं घेत होता. मात्र दोन महिन्यांपासून त्यानं औषधं बंद केली होती. त्यामुळे त्याला होणारा त्रास वाढत गेला. दीक्षित रविवारी दुपारी जेवला. त्यानंतर स्वत:च्या खोलीत गेला.
यानंतर घरातील इतर सदस्य कामानिमित्त बाहेर गेले. बाहेर गेलेले कुटुंबीय घरी परतले, तेव्हा त्यांना दीक्षित रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या जवळ एक ब्लेड होतं. हा संपूर्ण प्रकार पाहून कुटुंब घाबरलं. त्यांनी दीक्षितला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं.
मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर दीक्षितच्या कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासातून हे प्रकरण आत्महत्येचं वाटत आहे. मात्र पोलिसांकडून तपास सुरू आहे.


0 Comments