दीपक आबा सांळूखे-पाटील महाविद्यालय, कोळे
महाविद्यालयाच्या वतीने नव नियुक्त अधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला ):
कोळे व कोळे पंचक्रोशीतील भागातील नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक या पदावर नियुक्त झाल्याबद्दल दीपक डॉ. पतंगराव कदम बहुद्देशीय
शिक्षण संस्था, कोळे संचलित दीपक आबा साळुंखे-पाटील महाविद्यालय कोळे व दीपक आबा साळुंखे-पाटील सायन्स कॉलेज,
कोळे यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री दीपक माने,सचिव श्री अमोल माने, संचालक शरद माने, मार्गदर्शक
मा. बाळासाहेब करांडे, प्राचार्य डॉ.संतोष बंडगर, प्राचार्य. पी. बी आलदर यांच्या उपस्थिती नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक पदी अक्षयकुमार सलगर, निखिल कोरपे,
जयप्रकाश घागरे, प्रियंका कारंडे, शिल्पा लोंढे यांची निवड व ऋतुजा कोळेकर यांची कर सहाय्यक व मंत्रायल लिपिक या पदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने यांच्या मनाचा फेटा, श्रीफळ, शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभ प्रसंगी नवनियुक्त अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुष्यामध्ये ध्येय गाठण्यासाठी सातत्या कटोर परिश्रम अभ्यास चिकाटी जिद्द या बरोबर गुरुचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे त्याचबरोबर आपली नाळ आहे.


0 Comments