सांगोला व मंगळवेढा २०१८-१९ च्या चारा छावणीची बिले मिळाली नसल्यामुळे
जनावरांसह छावणी चालकांचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
सांगोला (प्रतिनिधी) :- अनेकवेळा मागणी करून सुध्दा सन २०१८-१९ च्या चारा छावणीची बिले मिळाली नसल्यामुळे काल बुधवार दि. २६ जुलै
पासून सांगोला तहसील कार्यालयासमोर सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील छावणी चालक जनावरांसह धरणे आंदोलनास बसले आहेत.
छावणीचे प्रलंबीत अनुदान जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे छावणी चालकांमधून सांगण्यात आले.
सांगोला व मंगळवेढा २०१८-१९ तालुक्यातील चारा छावणी चालक यांनी सन च्या दुष्काळात पशुधन जगविण्यासाठी पुढे
येवूनचारा छावण्या शासनाच्या नियमानुसार योग्य व चांगल्या प्रकारे चालविल्या होत्या. प्रत्येक छावणीवर एक अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक छावणीवर राहुन देखरेख करत होते.
त्याचप्रमाणे चारा, पाणी तपासणे, जनावरे मोजणे व त्यांच्या सहीने तहसील कार्यालयाला जनावरांच्या संख्येचा अहवाल दिला जात होता.
आठवडयातून एक वेळा छावणी समितीच्या सर्व सदस्यांच्या सहीने तहसील कार्यालयास जनावरांच्या संख्येचा अहवाल दिला जात होता.
तसेच पुरवठा विभागाची तालुक्याची टिम, जिल्ह्याची टिम आठवडयातून एकदा रात्री दिवसा कधीही भेट देवुन चारा छावणीची तपासणी करीत असत
वेळोवेळी अधिकार्यामार्फत दप्तर तपासणी, चारा पाणी तपासणी होवून भेट रजिस्टर मध्ये अधिकाऱ्यांनी नोंदी केलेल्या आहेत.
छावणी चांगल्या प्रकारे चालविल्याचे अहवाल दिलेले आहेत. छावणी चालकाने योग्य व चांगल्या प्रकारे चारा छावण्या चालविल्या असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
बिड, माण, खटाव व महाराष्ट्रातील इतर जिल्हयातीलछावणीची बिले देण्यात आली. परंतु कांही अधिकार्यांच्या व पुढार्यांच्या आर्थीक लालसेपोटी
सोलापूर जिल्हयातील चारा छावणीची बिले रखडण्यात आली आहेत. वेळो वेळी जिल्हाधिकारी, तहसिलदार,उपविभागीय अधिकारी
मंगळवेढा, महाराष्ट्र राज्य सचिव, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांना भेटुन व लेखी निवेदनाव्दारे चारा छावणीच्या बिलांची मागणी केली. परंतु या बाबत कोणत्याही प्रकारची दखलघेतली गेली नाही.
त्यामुळे छावणी चालकांना सावकार, बँकेचे पैसे देता येत नसल्यामुळे छावणी चालकावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे.
या आंदोलन स्थळी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्षडॉ. बाबासाहेब देशमुख, शिवसेनेचे दादा लवटे, विजयकुमार इंगवले, दादाशेठ बाबर यांनी भेट दिली...
दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तहसीलदार संजय खडतरे यांनी भेट देवून छावणी चालकांचे निवेदन स्विकारले.



0 Comments