google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयात वृक्षारोपण संपन्न.वृक्षारोपण काळाची गरज:- तहसीलदार संजय खडतरे

Breaking News

वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयात वृक्षारोपण संपन्न.वृक्षारोपण काळाची गरज:- तहसीलदार संजय खडतरे

 वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयात वृक्षारोपण संपन्न.वृक्षारोपण काळाची गरज:- तहसीलदार संजय खडतरे


सांगोला( प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

सांगोल्यातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. सुरुवातीस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तहसीलदार संजय खडतरे यांचा सत्कार संस्थेचे सचिव नीलकंठ शिंदे सर यांनी शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.

विविध प्रकारची वृक्ष या योजनेअंतर्गत प्रशाला परिसरात सर्व विविध जातींचे रोपांचे वृक्षारोपण तहसीलदार खडतरे व संस्थाध्यक्ष श्रीमती. कौशल्यादेवी शिंदे मॅडम, सचिव नीलकंठ शिंदे सर ,बेले काकू ,भाग्यश्री देशपांडे, प्रमिला जगदाळे ,प्रफुल देशपांडे, ऐश्वर्या देशपांडे ,दत्तात्रय पाटील सर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .

 यावेळी तहसीलदार खडतरे यांनी वृक्षारोपण गरजेचे असलेने सांगून महत्व सांगितले, मानवी जीवनात वृक्षांचे महत्व अधिक असल्याने  करोना काळात वृक्षांची कमतरता मोठ्या प्रमाणात आवश्यक असल्याने सदरचा उपक्रम राबवला असल्याचे प्रशालेच्या मुख्याध्यापक रमेश पवार सर  यांनी सांगितले.

 त्याचबरोबर वृक्ष संवर्धनाची जबाबदारी शिक्षक  घेणार असल्याचे सांगितले ,यावेळी प्रशाला परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले .वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार संतोष कुंभार सर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments