google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अधिस्वीकृती समितीवरील नियमबाह्य नियुक्त्यां रद्द करा..... महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदन ..

Breaking News

अधिस्वीकृती समितीवरील नियमबाह्य नियुक्त्यां रद्द करा..... महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदन ..

 अधिस्वीकृती समितीवरील नियमबाह्य नियुक्त्यां रद्द करा.....


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदन ..

 महाराष्ट्र शासनाने सेवाभावी संस्थांना पत्रकार संघटना म्हणून गृहीत धरून राज्य व विभागीय अधिस्वीकृती समितीवर नियमबाह्यपणे नियुक्ती दिली आहे. 

अशा नियुक्ती रद्द करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करीत नियुक्त रद्द करण्यात याव्यात या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय माहिती अधिकारी यांना देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य शासनाने शासकीय पत्रकार अधिस्वीकृती समिती नुकतीच गठीत केली आहे. पत्रकार अधिस्वीकृती समिती गठीत करताना शासनाने सर्व नियम निकष धाब्यावर बसवून सेवाभावी संस्थेला संघटना समजून त्यांच्या प्रतिनिधींना एकतर्फी पत्रकार अधिस्वीकृती समितीमध्ये घेतले आहे.

 नियमानुसार पत्रकारांच्या संघटनेचे अंतर्गत पदाधिकारी, पत्रकारांना न घेता सेवा संस्था अंतर्गत नोंदणी असलेल्या तसेच न्यायप्रविष्ठ असलेल्या सेवा संस्थेतील पदाधिकारी असलेल्या पत्रकारांची निवड समितीवर केली आहे. जी की नियमबाह्य आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रदेश संघटक संजयजी भोकरे साहेब   यांच्या मार्गदर्शनाखाली आज पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील, शहर अध्यक्ष नागेश आदापुरे, कार्याध्यक्ष सचिन कुलकर्णी, 

उपाध्यक्ष विनोद पोतदार, सचिव कुमार कोरे, प्रसिद्ध प्रमुख दादा कदम,शहर संघटक संजय यादव, ग्रामीण विभाग अध्यक्ष मनोज पवार, रामदास नागटिळक,रवींद्र कोळी,अश्पाक तांबोळी,अजित देशपांडे आदी पदाधिकारी पत्रकार मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments