सांगोला नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे सांगोला शहरातील
नागरीकांचा पैसा पावसाच्या पाण्याने चिखलात गेला वाहून
सांगोला/प्रतिनिधी ः सांगोला शहरातील नगरपरिषदेवर फक्त प्रशासनाची नेमणुक असल्यामुळे त्यांच्यावर आता कोणत्याही
लोकप्रतिनिधींची वचक न राहिल्यामुळे सांगोला शहरातील नगरपरिषदेचा कारभार हा फक्त आंधळ दळतं आणि कुत्रं पिठ खातं...
अशीच झाल्याची सध्याच्या सांगोला नगरपरिषदेच्या कारभारावरून तर दिसून येत आहे. सांगोला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरावस्था झालेली
असून ही काही प्रमाणात नैसर्गिक असली तरी काही ठिकाणी मात्र हे नगरपरिषदेकडून काही दिवसापूर्वी शौचालयांच्या ठिकाणी पाण्याची पाईप करीता
सर्व सांगोला शहरातून हे पाईपलाईन डांबरी रस्ते खोदून पाईपलाईपन करण्यात आली. व त्यावेळी ते खड्डे काही काळानंतर भुयारी गटारीच्या नावाखाली फकत मुजविण्यात आले
त्यावर डांबरीकरण त्यावर कोणत्याही प्रकारचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. तर काही ठिकाणी नगरपरिषदेमार्फत मोठया प्रमाणात व नियमबाह्य स्वरूपाचे स्पिड बे्रकर बनविण्यात आले आहेत.
त्यामुळे पावसाचे पाणी या स्पिडबे्रकरमुळे अडून मोठ्या प्रमाणात साचून राहत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळयामध्ये सांगोला शहरातील खड्डे
डांबरीकरण करून मुजविण्याचे ऐवजी ऐन पावसाळ्याचे दिवसात दरवर्षीप्रमाणे डांबरी रस्त्यांचे खड्डे हे मातीमिश्रित मुरूमांनी मुजविले जात असल्याचे चित्र सर्व
सांगोला शहरातील नागरीकांच्या निदर्शनास दिसून येत आहे. पाण्याच्या खड्डयात हे मातीमिश्रीत मुरूम टाकल्यामुळे पावसाचे पाणी या खड्यात गेल्यामुळे
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल तयार होवून वाहन धारकांना यावरून ये जा करतान गाड्या स्लिप होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
सांगोला नगरपरिषदेच्या या सर्व नियोजनशून्य कारभारामुळे सांगोला शहरातील नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नागरीकांतून सर्वसामान्यांचा पैसा असे कोणतेही
नियोजन व विचार न करता पैशाची उधळपट्टी करणे थांबवली पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांतून चर्चिली जात आहे.
सांगोला शहरातील सर्व रस्त्यावरील खड्डे हे पावसाचा अंदाज घेवून डांबरीकरणानेच मुजवून घ्यावेत डांबरी रस्त्यावरील खड्डे हे मुरूमांनी मुजविल्यामुळे त्या खड्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल तयार होवून ते रस्त्यावर आल्यामुळे
वाहनधारकांच्या गाड्या घसरण्याचे प्रमाणत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. व त्या मुरूमांमधील माती निघून जावून फक्त त्या खड्यात दगडच शिल्लक राहत
असून त्या खड्यामध्ये पाणी असल्यामुळे त्या दगडावंरून गाडी गेल्यावर त्या गाड्यावरील वाहनधारकांचे नियंत्रण जावून गाड्यांचे अपघात होतान दिसून येत आहे.
सांगोला नगरपरिषदेने त्या खड्यांमधील पाण्याची विल्लेवाट लावून ते खड्डे पूर्णपणे कोरडे झाल्यावर डांबरीकरणानेच मुजवावे
- मोहसीन खतीब, सामाजिक कार्यकर्ते


0 Comments