google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलिसांच्या कारवाईत गांजा व दारूसह ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त

Breaking News

सांगोला पोलिसांच्या कारवाईत गांजा व दारूसह ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त

 सांगोला पोलिसांच्या कारवाईत गांजा व दारूसह ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त


सांगोला / प्रतिनिधी(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

अवैधरीत्या गांजा तसेच देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्या तरुणास ताब्यात घेवून त्याच्याकडून १ किलो ९१५ ग्रॅम वजनाचा ३८ हजार ३०० रुपये किमतीचा गांजा आणि १३ हजार ९८० रुपयांची दारू असा ५२ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

 याप्रकरणी पोलिस नाईक नागेश निंबाळकरयांनी दिलेल्या फिर्यादीवरून जगदीश रावसाहेब केदार (रा.वासुद, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना गोपनीय माहिती मिळाली होती.

 त्यानुसार पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, स.पो.नि. काटकर, स. पो.फौ. कल्याण ढवणे, पो.ना. निंबाळकर, पो.ना. साळुंखे पो.ना. मेटकरी, पो.ना. गंगणे, पो. कॉ. सावंत, पो.कॉ. चोरमले, पो.ना. व्हरे यांनी जगदीश केदार याच्या घरावर छापा टाकला.

 त्यावेळी पोलिसांनी केदार याच्या घारातून १८ हजार ३०० रुपये माहितीनुसार जगदीश रावसाहेब केदार हा भाडोत्री घरात बेकायदेशीरपणे गांजा व दारूची विक्री करीत असल्याचीकिमतीचा उग्र वासाचा, ओलसर, पाने, फुले, बियांसह असलेला

 ९१५ ग्रॅम गांजा, २० हजार रुपये किमतीचा लहान पिशवीत पॅक केलेला उग्र वासाचा १ किलो गांजा, १० हजार ०८० रुपये किमतीचे देशी दारूचे ३ बॉक्स, ३ हजार ९०० रुपये किमतीची विदेशी दारू असा ५२ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Post a Comment

0 Comments