महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे
महाराष्ट्राच्या राजकारणातील अलंकार; शहाजीबापूंकडून तोंडभरून कौतुक
फडणवीस यांनी नेतृत्वाची क्षमता संपूर्ण राज्याला दाखवून दिली आहे, त्यांनी विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम केले आहे. त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राला आवडलेले आहे.
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना कलंक म्हणून काय उपयोग आहे. गेल्या १५ वर्षांतील महाराष्ट्राच्या राजकारणातील फडणवीस हे अलंकार आहेत.
एवढ्या कमी वयात एवढं प्रभावी नेतृत्व राज्याला देणं सोपं काम नाही, अशा शब्दांत सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
आमदार शहाजी पाटील यांनी नवे उमपुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही तोंडभरून कौतुक केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याला नेतृत्वाची मोठी परंपरा आहे.
फडणवीस यांनी नेतृत्वाची क्षमता संपूर्ण राज्याला दाखवून दिली आहे, त्यांनी विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम केले आहे. त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राला आवडलेले आहे.
खासदार संजय राऊत हे जाणीवपूर्वक उलटसुलट विधानं करत असतात. अजित पवारांना अर्थमंत्रीपद द्यायचे नसेल तर मुख्यमंत्रीपद द्या, असा कोणताही निरोप भाजप हायकमांडने शिवसेनेला दिलेला नाही.
संजय राऊत यांची खासदारकीची मुदत वर्षभर राहिली आहे, त्यांना आता कुठलाही पक्ष घेणार नाही, कारण त्यांना घेतले तर पक्ष फुटतो, हे लोकांना कळून चुकले आहे, असा टोमणा शहाजीबापूंनी राऊतांना लगावला.
अजितदादांनी माया केली तर सुप्रियाताई निवडून येतील...
अजित पवारांसोबत अनेक अनुभवी आमदार आले आहेत, ते मंत्री झाल्याने कारभाराला आणखी गती येईल. अजित पवार यांच्या येण्यामुळे शिवसेना-भाजप-रिपाइं युती आणखी भक्कम झाली आहे. महायुतीला निवडणुका सुकर झाल्या आहेत.
विधानसभेला आम्ही २२५ च्या पुढे जागा जिंकू. लोकसभेला चुकून एखादी गेली तर नाही तर आम्ही ४८ पैकी ४८ जागा जिंकू. चुकून म्हणजं अजितदादांनी माया केली,
तरच सुप्रिया सुळे या एकट्याच निवडून येतील. नाही तर आम्ही ४८ पैकी ४८ जागा नक्कीच जिंकू, असा दावाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.


0 Comments