सांगोला -चालू पावसाळी अधिवेशनात सांगोला विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग ग्रामीण रस्ते अशा १५ नवीन रस्त्यांच्या कामांसाठी एकूण ३५ कोटी २५ लाख
रुपयेचा निधी पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २४ कोटी ४५ लाख रुपये तसेच नाबार्ड योजनेमधून खवासपूर ते विठलापूर जोडणाऱ्या रोडवरील माण नदीवर नवीन पुलाच्या बांधकामासाठी १० कोटी ८० लाख रुपये असे
एकूण ३५ कोटी २५ लाख रुपयेचा निधी पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर केले आहेत. ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्ते व नवीन पुलाच्या कामांमुळे दळणवळणाच्या सोयी सुविधामुळे विकासाला चालना मिळणार असल्याचे
आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.
आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्त्याच्या कामांना पुरवणी अर्थसंकल्पात मंजुरी देऊन तातडीने निधीची तरतूद होण्याबाबत
पत्र देवून मागणी केली होती. मंत्री महोदय यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मागणी केलेल्या पत्राची दखल घेऊन चालू पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात वरीलप्रमाणे १५ नवीन
रस्ते व पुलाच्या बांधकामासाठी निधीची तातडीने तरतूद केली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी मंजूर झालेला निधी पुढीलप्रमाणे दिघंची जिल्हा हा्द्द ते खवासपूर लोटेवाडी सोनलवाडी एखतपुर सांगोला
वाढेगाव मेडशिंगी आलेगाव वाकी घेरडी वाणी चिंचाळे भोसे रस्त्यासाठी -३ कोटी रुपये , प्रस्तावित राज्य मार्ग अजनाळे यलमर मंगेवाडी वाटंबरे राजुरी हटकर मंगेवाडी जुजारपूर जुनोनी कोळा रस्त्यासाठी-२ कोटी रुपये , बेनुर जुनोनी गौडवाडी रस्ता सुधारणा करण्यासाठी -७० लाख रुपये ,
सांगोला इमडेवाडी लक्ष्मी दहिवडी रस्ता सुधारणे ३० लाख रुपये , मांजरी देवकते वाडी धायटी हलदहिवडी गायगव्हाण ते राज्य मार्ग १४३ ला मिळणारा रस्ता सुधारणे १ कोटी ५० लाख रुपये, बलवडी चोपडी बंडगरवाडी सोमेवाडी इराचीवाडी कोळा कोंबडवाडी ते किडेबिसरी रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे
२ कोटी ७० लाख रुपये, जिल्हा हद्द चिंद्यापीर चोपडी हातीद जुजारपूर ते प्रजीमा १६४ ला मिळणारा रस्ता सुधारणा करणे -१ कोटी तसेच जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग प्र ११० ते अकोला कोळी मळा लोणविरे रस्ता सुधारणा करणे -३ कोटी ,
महिम ते जैनवाडी रस्ता सुधारणा करणे -१ कोटी , राज्य मार्ग १२५ ते कडलास (गायकवाड वस्ती ) ग्रामीण मार्ग -१११ मध्ये सुधारणा करणे -१ कोटी ५० लाख रुपये , कडलास पवार वस्ती मेटकर वस्ती ते आलेगाव रस्ता सुधारणा करणे -२ कोटी ५० लाख रुपये,
भंडीशेगाव ते धोंडेवाडी ता पंढरपूर ग्रामीण मार्ग २८ किमी रस्ता सुधारणा करणे -१ कोटी ५० लाख रुपये , ग्रामीण मार्ग -४२१ कोळा ते मोलमांगेवस्ती रस्ता सुधारणा करणे ७५ लाख रुपये , चोपडी ते यादव मळा रस्ता ग्रामीण मार्ग - ४ किमी रस्ता सुधारणा करणे १ कोटी ५० लाख रुपये
व राजुरी ते प्ररामा ६ रस्ता सुधारणा करणे १ कोटी ५० लाख रुपये असे एकूण २४ कोटी ४५ लाख रुपये तसेच नाबार्ड योजनेतून खवासपूर ते विठलापूर जाणाऱ्या रोडवरील माण नदीवर १० कोटी ८० लाख रुपये नवीन पुलाच्या बांधकामासाठी निधीची तरतूद केली आहे.
चौकट - चालू पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे मागणी केल्याप्रमाणे सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्ते २४ कोटी ४५ लाख तसेच बहुप्रतिक्षेतील खवासपूर - विठलापूर( आटपाडी )
जोडणाऱ्या माणनदीवरील पुलाच्या बांधकामासाठी १० कोटी ८० लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. मंजूर निधीतून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार रस्ते व पुलाचे कामे वेळेत करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांना केल्या आहेत - आमदार शहाजीबापू पाटील


0 Comments