google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अचकदाणी येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनजवळ त्याच्या दुचाकीला अपघात तरुण कुशन व्यावसायिकचा उपचारापूर्वी मृत्यू

Breaking News

अचकदाणी येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनजवळ त्याच्या दुचाकीला अपघात तरुण कुशन व्यावसायिकचा उपचारापूर्वी मृत्यू

अचकदाणी येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनजवळ


त्याच्या दुचाकीला अपघात तरुण कुशन व्यावसायिकचा उपचारापूर्वी मृत्यू 

भावाला घरी येत असल्याचा निरोप दिला, तासात अपघातात मृत्यूचा निरोप आला

लोटेवाडी- अचकदाणी रस्त्यावर अपघात: कुशन कामासाठी गेले होते बाहेरगावी सांगोला कुशनच्या कामानिमित्त परगावी गेलेल्या भावाने सख्ख्या भावाला फोन करून मी घरी येत आहे.

 असा निरोप दिला अन् तासाभरातच घराकडे परतताना वाटेत दुचाकीचा अपघात झाल्याची घटना समजली. या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे तरुण कुशन व्यावसायिकचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.

हा अपघात रविवार, दि. १६ जुलै रोजी रात्री १०:३० च्या सुमारास लोटेवाडी ते अचकदाणी (ता. सांगोला) रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशन जवळ घडला. प्रमोद बळीराम राजगुरु (वय २४, रा. वाकी, ता. सांगोला)असे मयताचे नाव आहे. याबाबत भाऊ राहुल बळीराम राजगुरू यांनी पोलिसात खबर दिली.

वाकी शिवणे येथील राहुल राजगुरू व भाऊ प्रमोद राजगुरु हे दोघे गावात कुशनचे दुकान चालवितात. प्रमोद राजगुरू हा १५ जुलै रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास कुशनच्या कामानिमित्त विटा (जि. सांगली) येथे दुचाकीवरून गेला होता. तेथील काम आटोपल्यानंतर रविवार, दि. १६ जुलै रोजी रात्री १ च्या सुमारास विट्यातून

 आटपाडी येथे आल्यानंतर प्रमोदने राहुल यास फोन करून मी घरी येत असल्याचे सांगितले होते. दरम्यान प्रमोद दुचाकीवरून आटपाडी ते खवासपुर येथून वाकीयेथील घराकडे येत असताना अचकदाणी येथील वीज वितरण कंपनीच्या

 सबस्टेशनजवळ त्याच्या दुचाकीला अपघात होऊन तो बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडला होता. दरम्यान रात्री १०:३० च्या सुमारास संजय राजगुरू यांनी राहुल यास फोन करून प्रमोदचा अचकदाणीजवळ अपघात झाल्याची माहिती दिली.

त्यानंतर सुनील राजगुरू, विष्णू राजगुरू, संजय राजगुरू व राहुल राजगुरू यांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमी प्रमोद वास उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments