google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना पंढरपुर तालुक्यात ! डोक्यात रॉड मारून एकाचा मर्डर

Breaking News

धक्कादायक घटना पंढरपुर तालुक्यात ! डोक्यात रॉड मारून एकाचा मर्डर

धक्कादायक घटना पंढरपुर तालुक्यात ! डोक्यात रॉड मारून एकाचा मर्डर


सोलापूर जिल्ह्यातील एक मोठी बातमी समोर येत आहे. डोक्यात रॉड मारून एका शेतकऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना

 पंढरपुर तालुक्यातील अनवली येथे घडली. आबासाहेब मारुती मिटकरी (वय ५५, रा. अनवली, ता. पंढरपूर) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

 याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत अभिमान मेटकरी हे काल अनवली येथील जनावरांच्या बाजारात जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. 

ते रात्री घरी आलेच नाहीत. घरच्यांनी तात्काळ पंढरपूर ग्रामीण पेालिसांना याबाबतची कल्पना दिली. 

शिवाय कुटुंबियांनी रात्रभर पंढरपूर शहराबरोबरच परिसरातील अनेक गावात शोधाशोध केली. दरम्यान, पोलिसांकडून शोध घेत असतानाच आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. 

डोक्यात रॉडने मारून त्यांची हत्या झाली असावी अशी माहिती पोलिसाकडे आली आहे. याचा अधिकचा तपास पंढरपूर पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments