न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये
आंतरराष्ट्रीय न्याय दिवस कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेऊन उत्साहात संपन्न
तालुका विधी सेवा समिती, विधिज्ञ संघ सांगोला व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न*
सांगोला प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)
17 जुलै हा दिवस सर्वत्र आंतरराष्ट्रीय न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो, याचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल, जुनियर कॉलेज सांगोला मध्ये विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन मिळावे, या हेतूने तालुका विधी सेवा संघ समिती विधिज्ञ संघ सांगोला व राष्ट्रीय सेवा योजना न्यू इंग्लिश स्कूल व जूनियर कॉलेज सांगोला,
यांच्यावतीने या शिबिराचे आयोजन करून आंतरराष्ट्रीय न्याय दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी जुनिअर कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक हेमंत आदलिंगे, संस्था सदस्य प्राध्यापक जयंत जानकर, उपमुख्याध्यापक प्राध्यापक नामदेव कोळेकर, उपप्राचार्य प्राध्यापक केशव माने,
पर्यवेक्षक प्राध्यापक संजय शिंगाडे,सांस्कृतिक विभाग प्रमुख व प्रकल्पाधिकारी प्राध्यापक संतोष राजगुरू, जुनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मार्गदर्शन शिबिराच्या अध्यक्षस्थानी दिवानी न्यायिक कनिष्ठ स्तर तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माननीय श्री एस एम घुगे साहेब हे होते. यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत मध्ये उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शालेय जीवन जगत असताना
त्याचबरोबर भावी आयुष्यामध्ये आपण कोण कोणत्या कायद्याचं पालन केले पाहिजे, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी नियमाचे उल्लंघन केले तर त्यांना कोण कोणत्या कलमांच्या आधारे शिक्षा होऊ शकते, हे उपस्थितांना सांगितले.
यावेळी आंतरराष्ट्रीय न्याय दिवस याविषयी एडवोकेट ए एस पटेल यांनी तर बाल न्याय कायदा याविषयी एडवोकेट श्री व्ही एस गायकवाड यांनी सक्तीचा शिक्षण हक्क कायदा याविषयी एडवोकेट श्री व्ही बाबर यांनी तर बेटी बचाव बेटी पढाव याविषयी एडवोकेट श्रीमती गिराम यांनी तर बालकांचे हक्क याविषयी एडवोकेट श्री एस बी पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कायद्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट डि. ए. आलदर यांनी, प्रास्ताविक एडवोकेट व्ही. बि. घाडगे यांनी तर आभार न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला चे प्राचार्य प्रा. हेमंत आदलिंगे यांनी मानले.


0 Comments