google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील महूद येथे अर्धवट गटार काम पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून सातत्याने दुर्लक्ष सांडपाणी साठून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण गटार ताबडतोब पूर्ण करावे अशी महुद ग्रामस्थांमधून मागणी

Breaking News

सांगोला तालुक्यातील महूद येथे अर्धवट गटार काम पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून सातत्याने दुर्लक्ष सांडपाणी साठून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण गटार ताबडतोब पूर्ण करावे अशी महुद ग्रामस्थांमधून मागणी

सांगोला तालुक्यातील महूद येथे अर्धवट गटार काम पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभाग


यांच्याकडून सातत्याने दुर्लक्ष सांडपाणी साठून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण गटार ताबडतोब पूर्ण करावे अशी महुद ग्रामस्थांमधून मागणी

 सांगोला तालुक्यातील महूद येथून जाणाऱ्या पंढरपूर- मल्हारपेठ या राज्यमार्ग क्रमांक 53 च्या बाजूला महूद गावठाणात गेली अडीच वर्ष दक्षिण बाजूचे अर्धवट गटार काम पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे अपूर्ण राहिलेले आहे. त्यामुळे सांडपाणी साठून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झालेले आहेत म्हणून गटार ताबडतोब पूर्ण करावे अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे. 

पंढरपूर ते मल्हारपेठ हा राज्यमार्ग पंढरपूर, महूद, दिघंची, मायणी, उंब्रज, मल्हारपेठ असा जातो या राज्यमार्गाचे नवीन काम होऊन सुमारे तीन वर्षे पूर्ण होत आली आहेत. या मार्गावर येणाऱ्या सोनके, चिकमहूद, दिघंची अशा सर्वच गावांमधील रस्त्याचे व गटाराची बांधकाम पूर्ण झालेली आहेत .

मग पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे महूद गावठाणातील गटाराचे बांधकाम अर्धवट का ठेवण्यात आले आहे हा प्रश्न पुढे येतो? या अर्धवट गटार बांधकामविषयी महूद ग्रामपंचायत ने ही वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा करून देखील पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभाग या कामाकडे लक्ष देत नाही. 

या अर्धवट गटार कामामुळे या राज्यमार्गालगत असणारे दोन्ही बाजूचे हॉटेल व्यवसायिक व इतर व्यवसायिक यांचे खरकटे पाणी रस्त्यावर पडू लागले आहे त्यामुळे यापूर्वी या तेलकट पाण्यामुळे वाहने घसरून पडण्याचे प्रकार घडले आहेत.

त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवाला धोका आहे तसेच गटारीलगतचे सांडपाणी तुंबल्यामुळे आरोग्य समस्या निर्माण झाली आहे. ती गटार न बांधल्याने पावसाचे सर्व पाणी दक्षिण बाजूच्या रस्त्याच्या कडेला साठून राहत आहे. पावसाचे पाणी दक्षिणेकडे राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये घुसत आहे. 

रस्त्याच्या दक्षिण बाजूने ग्रामपंचायतची पाणीपुरवठा पाईपलाईन गेली असल्यामुळे त्यावेळी रस्त्याचे काम करताना या पाईपलाईनची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली त्यामुळे त्या बाजूला राहणाऱ्या वसाहतीमध्ये व गावठाण पुढील लोकांना पाणीपुरवठा करता येत नाही 

म्हणून गटारीचे बांधकाम गंभीर्याने व तात्काळ पूर्ण व्हावे ही महूद ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे. जर हे गटार बांधकाम तात्काळ पूर्ण न झाल्यास, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या विरोधात महूद ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.     

Post a Comment

0 Comments