सांगोला शहरातील रस्त्याची दुरावस्था
सांगोला नगरपालिका याकडे लक्ष देणार आहे का नाही
शहरातील सर्व मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणी रस्ता उखडलेला आहे पावसाळ्यात रहदारीसाठी नागरिकांना मोठा त्रास घ्यावा लागत आहे सध्या नगरपालिकेतील अधिकारी वर्ग याकडे लक्ष देणार आहे.
असा प्रश्न सर्वसामान्य सांगोला वासियांना पडला आहे प्रशासनामध्ये गुंठेवारी प्रकरण बांधकाम परवाने वापर परवाने एनओसी दाखले याकडे त्यांचे लक्ष आहे नागरिकांच्या प्रचंड तक्रारी येत आहेत.
आर्थिक देवाण-घेवानाची चर्चा शहरभर चर्चिली जात आहे हे अतिशय दुर्दैवी लोकशाहीला मारक आहे काही ठराविक लोकांचीच कामे होतात सर्व सामान्य नागरिकांना सतत हेलपाटे घालावे लागत आहेत.
पावसाळा सुरू झाला आहे माननीय मुख्याधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शहरातील प्रमुख मार्गावरील खड्डे डांबराने भरून घ्यावेत व प्रलंबित सार्वजनिक लोकहिताच्या कामाकडे अधिकचे लक्ष द्यावे शहरालगतच्या हद्द वाढ भाग तसेच लगतच्या वाड्या वस्तीवरील काही रस्त्यांची दयनीय अवस्था झाली.
असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तरी प्रशासनाने वाड्या वस्तीवर आवश्यक त्या ठिकाणी मुरूम टाकून घ्यावा व शहरातील रस्ते वरील खड्डे डांबराने मुजवून घ्यावेत अशी शहरवासीयांच्या वतीने विनंती..
भुयारी गटारी योजनेच्या नावाखाली शहरातील सर्व रस्त्यांची अत्यंत दयनीय दुर्दशा पावसाळ्यात काही लहान मोठे अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने गांभीर्याने मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवून घ्यावेत.


0 Comments