ब्रेकिंग... यापुढे 'जन्म प्रमाणपत्रच' एकमेव कागदपत्र म्हणून गाह्य धरले जाईल - केंद्र सरकारचा मोठा निर्णय
केंद्र सरकारने आज लोकसभेत जन्म आणि मृत्यूची नोंदणी दुरुस्ती विधेयक, 2023 सादर केले आहे. त्यामुळे नवीन कायदा लागू झाल्यानंतर कोणत्याही शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल,
किंवा आधार कार्ड काढण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तसेच मतदार यादी तयार करण्यासाठी किंवा विवाह नोंदणी आणि सरकारी कामांमध्ये यापुढे 'ऑल इन वन' दस्तऐवज म्हणून जन्म प्रमाणपत्राचा वापर केला जाईल,असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
याद्वारे जन्म आणि मृत्यूचा डेटा तयार केला जाणार तसेच आधार कार्डसारखी कागदपत्रांची व्हॅलिडीटी ठरविली जाणार आहे. यामुळे एकाच सर्टिफिकीटद्वारे अनेक गोष्टींपासून मुक्ती मिळणार आहे.
यापुढे कोणत्याही कामासाठी 'जन्म प्रमाणपत्र' एकमेव कागदपत्र म्हणून गाह्य धरले जाईल हि बातमी आपण इतरांना देखील शेअर करा.


0 Comments