google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला प्रशासकांच्या हातातील कारभार आमच्या हातात कधी येणार? गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी नगरसेवकांची प्रतीक्षा कधी संपणार? : निवडणूक कार्यक्रमाकडे लक्ष

Breaking News

सांगोला प्रशासकांच्या हातातील कारभार आमच्या हातात कधी येणार? गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी नगरसेवकांची प्रतीक्षा कधी संपणार? : निवडणूक कार्यक्रमाकडे लक्ष

सांगोला प्रशासकांच्या हातातील कारभार आमच्या हातात कधी येणार?


गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी नगरसेवकांची प्रतीक्षा कधी संपणार? : निवडणूक कार्यक्रमाकडे लक्ष

सांगोला : शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला 

डिसेंबर २०२१ रोजी मुदत संपलेल्या सांगोला नगरपालिका निवडणुकीस तब्बल १९ महिने अर्थात एक वर्ष सात महिने संपत आले तरी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत 

नसल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी नगरसेवकांची प्रतीक्षा अजून प्रतीक्षाच उरली आहे. 

मध्यंतरी प्रभाग रचना कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला होता. एप्रिलदरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार होती.

 तत्पूर्वी राज्य सरकारमध्ये फेरबदल झाला आणि निवडणुका पुन्हा रखडल्या. परिणामी, अपेक्षाभंग झाला. भावी उमेदवारांचे दुखणे 'धड सांगताही येईना आणि

भावी नगरसेवकांचा चांगलाचसहनही होईना' असे झाले आहे.

सांगोला नगरपालिका निवडणुकीची मुदत संपून १९ महिने झाले. मुदत संपलेल्या कार्यकाळात सध्या प्रशासक म्हणून तहसीलदार काम पाहत आहेत, तर पालिकेचा कारभार हा मुख्याधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे.

मागील १९ महिन्यांचा कारभार हा प्रशासनावर अवलंबून आहे. सध्या तरी निवडणुकीसंदर्भात वरिष्ठांकडून कोणतेही आदेश नसल्याची माहिती आहे.

सांगोला नगरपरिषदेत पूर्वी २० नगरसेवक व दोन स्वीकृत नगरसेवक निवडले जात होते. मध्यंतरी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना

 वाढीव लोकसंख्येच्याआधारे प्रभाग वाढविण्याच्या दृष्टीने नवीन अध्यादेश काढण्यात आला. यामध्ये २०११ च्या जनगणनेनुसार 

सांगोला नगरपरिषदेची ३४ हजार ३२१ लोकसंख्या आहे. त्यानुसार एकूण २३सदस्य निवडून द्यायचे होते. 

एक ते १० प्रभागात दोन नगरसेवक असे २० नगरसेवक, तर ११ व्या प्रभागातून एकूण तीन सदस्य असे एकूण २३ नगरसेवक निवडून येणार होते.

त्या अनुषंगाने प्रभाग रचना जाहीर करण्यासाठी प्रशासकीय कामकाज पूर्ण झाले होते. तत्कालीन मुख्याधिकारी यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संबंधित प्रभाग रचनेचा 

आराखडा सादर केला होता. केवळ मंजुरी मिळणे बाकी होते. तत्पूर्वी सरकारमध्ये बदल झाला. या निवडणुकांचे निर्णय रद्द करुन निवडणुकीसंदर्भात स्थगिती देण्यात आली.

 यामुळे भावी नगरसेवकांच्या स्वप्नावर विरजण पडले.सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. भावी नगरसेवक म्हणून अनेकजण दवंडी पिटताना दिसून येत आहेत.

सध्या निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आहे, परंतु नगरपालिका निवडणुकीसाठी

अनेकांचे लक्ष लागून राहिलेल्याकोणताही निर्णय अथवा घोषणा होत नसल्याने सांगोला नगरपालिकेचे 

भावी नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्याकडून मतदारांचा सन्मान आणि मान राखण्यात अजून किती दिवस असाच काहीसा सूर जाणार, असाच आहे.

चौकट

इच्छुकांची दमछाक

निवडणूक कालावधी संपून एक वर्ष सात महिने पूर्ण होत आहेत. यामुळे भावी मतदारांना रामराम ठोकण्यात दिवस चालले आहेत, परंतु निवडणुका जाहीर होत नाहीत,

 असे ऐकण्यास मिळत आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले उमेदवार आज 'नमस्ते' 

आणि 'राम राम' एवढ्यापुरतेच मर्यादित राहिलेत का, अशाही गमतीच्या गप्पा सुरू आहेत. निवडणूक आयोग

 कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर करणार असल्याचे बोलले जात असले तरी सध्या भावी उमेदवारांची मोठी दमछाक होत आहे.

Post a Comment

0 Comments