google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोळे येथे संत नामदेव महाराज समाधी संजवनी सोहळा उत्सव साजरा...!

Breaking News

कोळे येथे संत नामदेव महाराज समाधी संजवनी सोहळा उत्सव साजरा...!

 कोळे येथे संत नामदेव महाराज समाधी संजवनी सोहळा उत्सव साजरा...!


कोळे /वार्ताहर (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म महाराष्ट्र व पंजाब पर्यंत नेणारे आद्य प्रचारक महाराष्ट्रातील वारकरी व संतकवी 

श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी व ६७३व्या संजवनी सोहळा मारुती मंदिर कोळे  ता.सांगोला याठिकाणी साजरा करण्यात आला.

 या सोहळ्यासाठी कोळे ग्रामपंचायत सदस्य नामदेव आप्पा आलदर यांचे कडून नामदेव महाराज यांचे फोटोस हार अर्पण करून सदर कीर्तनाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. 

यावेळी भाळवणी ता. पंढरपूर चे प्रसिद्ध कीर्तनकार व प्रवचनकार श्री. रामदास माने महाराज व दत्तू आण्णा कोळेकर भजनी मंडळ कोळे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळीव डेप्युटी सरपंच कोळे 

डॉ. सादिक पटेल, शिवाजी आलदर,विष्णू सरगर,असलम पटेल, लक्ष्मण देशमुख सर,शिवाजी खंडागळे, रामा सोनवणे,अरुण बजबळकर,सचिन मोहिते व सर्व नामदेव शिंपी समाज बांधव व सर्व  कोळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments