सांगोला शहरात एखतपूर रोड जवळ सालगडी पती-पत्नीला
कोयता, चाकूचा धाक दाखवून गळ्याला कोयता लावून लुटले
सालगडी पती-पत्नीला कोयता, चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने लुटल्याचा प्रकार
पहाटे चारच्या सुमारास सांगोला एखतपूर रोडवरील प्रकाश कांबळे यांच्या शेतातील वस्तीवर घडला.
यामध्ये चोरट्याने गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे १८ ग्रॅम सोन्याचे दागिने काढून घेऊन १५० ग्रॅम चांदीचे दागिन्यांसह रोख ४० हजार रुपये नेले. जाताना पती-पत्नीला घरात कोंडले.
तसेच घराशेजारील वृद्ध महिलेच्या गळ्यातील४० हजार रुपये किमतीचे ११ ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून तेथून धूम ठोकली. या घटनेत पती-पत्नी जखमी झाले आहेत.
चोरट्याने जाताना त्यांच्या जवळच राहणारे रवींद्र गुळमिरे यांच्या घराच्या दरवाज्याची आतून लावलेली कडी काढून घरात प्रवेश करीत आई शिलादेवी गुळमिरे यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून तेथून धूम ठोकली.
दोघे पती-पत्नी मिळून प्रकाश कांबळे यांच्या सांगोला रोडवरील शेतात सालगडी म्हणून कामास आहेत. भीमराव शिंदे घराच्या बाहेरकामास आहेत. भीमराव शिंदे घराच्या बाहेर ओट्यावर झोपले होते.
तर पत्नी घरामध्ये दरवाजा बंद करून झोपली होती. दरम्यान पहाटे ४ च्या सुमारास एकाने गळ्याला चाकू लावून जर आरडाओरडा केला तर जीवे मारीन असे धमकावून त्याच्या हातातील उलट्या कोयताने त्यांच्या पाठीवर मारहाण केल्यामुळे घाबरून ते गप्प बसले.
त्यावेळी दोघांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याला धक्के दिल्यामुळे दरवाजाच्या आतील कडी तुटताच तिघेजण घरात घुसले. पत्नीस दमदाटी करत दागिन्यासह रोकड पळवली.


0 Comments