सांगोला तालुक्यात पती-पत्नीच्या झालेल्या वादात व दारूच्या नशेत पतीने पत्नीला
विहिरीत ढकलून देऊन स्वतःही विहिरीत पडून पती-पत्नी मृत्युमुखी
(सांगोला प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
पती-पत्नीच्या झालेल्या वादात व दारुच्या नशेत पतीने पत्नीला विहिरीत ढकलून देऊन स्वतः ही विहिरीत बडून पती-पत्नी मृत्युमुखी पडल्याची घटना मेटकरवाडी, घेरडी (ता. सांगोला) येथे घडली आहे.
या घटनेमध्ये सिद्धाराम सुभाष कारंडे (वय 28) व सोनाली सिद्धाराम कारंडे (वय 25, रा. मेटकरवाडी, घेरडी ता. सांगोला) हे पती-पत्नी मृत्यूमुखी पडले आहेत.
लक्ष्मण बाबू आलदर (रा. मेटकरवाडी, घेरडी (ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घराशेजारी त्यांच्या मेहुण्याचा मुलगा सिद्धाराम सुभाष कारंडे हा त्याची पत्नी सोनाली, तीन मुली असे त्याची आजीसह राहत होता.
सिद्धाराम यास दारू पिण्याचे व्यसन होते. दिनांक 13 जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराशेजारावरून शेजारी राहणारी सोनाली कारंडे हे त्यांच्या शेतात गेलेली दिसली.
त्यानंतर त्याच्या पाठीमागून सिद्धाराम हाही गेला. त्यावेळेस तो दारु पिलेला होता. पती-पत्नीमध्ये वाद चालू होता.
थोड्या वेळाने फिर्यादीही त्यांच्या पाठीमागे गेला असता सिद्धाराम हा सोनाली हिला शेतातील विहिरी जवळच मारहाण करत होता.
या वादातच सिद्धाराम यांनी त्याची पत्नी सोनालीला विहिरीत ढकलून दिले. यावेळी फिर्यादीने पळत जाऊन विहिरीत उडी मारून सोनालीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता,
त्यावेळेस सिद्धाराम याने विहिरीत उडी मारली व आपल्या पत्नीचा पाय ओढून विहिरीतील पाण्यामध्ये नेले.
फिर्यादीने आपला जीव वाचवण्यासाठी विहिरीच्या कडेवर आला. परंतु या वेळेमध्ये सिद्धाराम याने आपल्या पत्नीला पाण्यात बुडवले व स्वतःही बुडून दोघांचा मृत्यू झाला. विहिरीला पायऱ्या नसल्यामुळे फिर्यादीलाही वर येता येत नव्हते.
सायंकाळी सातच्या सुमारास लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकल्यानंतर फिर्यादी लक्ष्मण आलदर यांनी विहिरीतून आवाज दिला.
आवाजावरून लोकांनी फिर्यादीस व पती-पत्नीचे प्रेतं विहिरीबाहेर काढले. या घटनेची फिर्याद लक्ष्मण अलदर यांनी 14 जुलै रोजी सांगोला पोलिसात दिली आहे.


0 Comments