भारतीय जनता पार्टीचा बुलंद आवाज”किरीट सोमय्या यांचा खळबळजनक
व्हायरल व्हिडिओ..विरोधकांकडून चौकशीची मागणी
विरोधकांना जेरीस आणणारे भारतीय जनता पार्टीचे लाडके नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक व्हिडिओ चॅट समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
काळापासून सोमय्या यांचा खळबळजनक व्हिडिओ लोकशाही वृत्तवाहिनी व्हिडीओत सोमय्या आक्षेपार्ह स्थितीत दिसून येत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ माजली
असून विरोधकांकडून भाजप व सोमय्यावर टीकेटी झोड उठवण्यात येत असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही केली जात आहे.
तर असं ऐकतो आहे की,त्यांच्याविरोधात अनेक महिलांनी तक्रार केले आहेत. माझे पंतप्रधान, गृहमंत्री ईडी यांच्याशी माझे फार जवळचे संबंध आहेत. ते सगळे माझ्या तालावर नाचतात..
म्हणून काही लोकांना ब्लॅकमेल केल्याच्या तक्रारीसुद्धा काही ठिकाणी आल्या आहेत.. असं माझ्या कानावर आलं आहे.’ अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दुसऱ्यांवर चिखल उडविणारे सोमय्या चिखलामध्ये लोळताहेत – विद्या चव्हाण
किरीट सोमय्या यांच्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. किरीट सोमय्यांच्या व्हिडीओमुळे मला धक्का बसला आहे. दुसऱ्यांवर चिखल आणि शिंतोंडे उडविणारे
सोमय्या स्वतः चिखलामध्ये लोळत आहे. त्यांचे अनैतिक व्यवहार आणि संबंध बाहेर असतील तर दुसऱ्यावर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला आहे
यामुळे आजच अधिवेशन या प्रश्नामूळे गाजणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


0 Comments