ब्रेकिंग न्यूज... शेलेवाडी येथे विषबाधेमुळे24 मेंढ्या मृत तर80मेंढ्या बाधित पशुवैद्यकीय विभागाकडून तातडीने उपचार
मंगळवेढा तालुक्यातील शेलेवाडी येथे मेंढ्या चालण्यासाठी आलेल्या सांगली जिल्ह्यातील कुची वासुदेव गोरडे या मेंढपाळाची दिनांक 18 रोजी रात्री 11च्या सुमारास विषबाधेमुळे 80 मेंढ्या बाधित झाल्या
असून24 मेंढ्या मृत पावल्या आहेत. कष्टाने सांभाळलेल्या मेंढ्या अचानक मृत पावल्याने या मेंढपाळाचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर,सांगली जिल्ह्यातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात तेथील मेंढपाळ मेंढ्या चालण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात दाखल होत असतात.
सांगली जिल्ह्यातील कुची येथील वासुदेव गोरडे हे आपल्या200 मेंढ्या जगवण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील शेलेवाडी परिसरात मुक्कामी आहेत.
दिनांक 18 रोजी दिवसभर त्यांनी मेंढ्या परिसरातील डाळिंब शेवग्याच्या बागेत चारल्या व सायंकाळी आपल्या मुक्कामी आणले
असता रात्री 11च्या सुमारास 24मेंढ्या मृत अवस्थेत पडल्या तर 56मेंढ्या बाधित झाल्या होत्या त्यानी पहाटे बघितल्यानंतर
मेंढ्या मृत पावल्याचे लक्षात येताच त्यांनी धावपळ सुरू केली. अचानकपणे झालेल्या या नुकसानीमुळे गोरडे कुटुंबीय आर्थिक खाईत सापडले आहे.
मृत मेंढ्यांची माहिती प्रशासनाला कळविल्या नंतर प्रशासनाने याची तातडीने दखल घेत डॉ. सुहास सलगर डॉ तानाजी भोसले, डॉ. देशमुख, डॉ. सत्यवान यादव डॉ. गणेश जतकर, डॉ. सचिन पाटील यांच्या पथकाने तातडीने उपचार करत
56 विष बाधित झालेल्या मेंढ्या वर उपचार केले तर येथील 24 मेंढ्या मृत झाले आहेत उपचार केलेल्या मेंढ्या व्यवस्थित आहेत.
दिनांक 18 रोजी येथील एका डाळिंब बागेत मेंढपाळ आणि मेंढ्या कारल्याची माहिती असून या बागेवर औषध फवारल्याचे समजते या औषधामुळे विषबाधा झाल्याची माहिती आहे.
संबंधित मेंढपाळाचे या घटनेमुळे मोठे नुकसान झाले असून त्याला आर्थिक भरपाई देण्यात यावे अशी मागणी होत आहे.
दरम्यान कालपासून पावसाची संततधार असून जनावरांच्या चाऱ्याचे हाल होत असताना डाळिंब बागेत मेंढ्या चा नेल्याचे समजते.चालू पावसातच
पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी विषबाधा झालेल्या मेंढ्या उपचार करत मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन केले.अचानक झालेल्या या नुकसानीमुळे गोरडे कुटुंबीय धाय मोकलून रडत होते.


0 Comments