google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर आईशी संबंध ठेवणाऱ्याचा मुलांनी केला खून, तिघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

Breaking News

सोलापूर आईशी संबंध ठेवणाऱ्याचा मुलांनी केला खून, तिघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

सोलापूर आईशी संबंध ठेवणाऱ्याचा मुलांनी केला खून, तिघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक


सोलापूर : आईशी संबंध ठेवत असल्याने दोन्ही मुलांनी मिळून श्रावण चव्हाण याचा खून केला.

त्यास कारमध्ये आणून वाहनासह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सुनील घाडगे (वय २८) व राहुल शांताराम घाडगे (वय ३०), दोघे रा. अंदरसुल, ता. येवला या दोघांनी श्रावण चव्हाण यास ३ जूनला अंदरसुल येथे सकाळी ९.३० वाजता बोलावले व त्यानंतर या दोघांसह एका महिलेने श्रावण यास जिवे मारून 

त्याच्याच स्विफ्ट कारमध्ये आणून वाहनासह जाळण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद मृताचा भाऊ संभाजी रघुनाथ चव्हाण यांनी करमाळा पोलिस स्टेशनमध्ये दिली.

या प्रकरणातील कार (एमएच १५ सीटी ८००६) करमाळा हद्दीत ५ जूनला सापडली. याप्रकरणी करमाळा पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी सहायक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर, हवालदार अजित उबाळे 

यांना येवला येथे तपासाबाबत पाठविले तर स्थानिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मिठू जगदाळे व प्रवीण साने यांना पाठविले. पोलिसांनी अत्यंत जलद तपास करून खुनाचे कारण शोधले व आरोपीपर्यंत पोहोचले. 

सहायक पोलिस निरीक्षक मिठू जगदाळे यांनी संशयित आरोपी सुनील घाडगे व राहुल घाडगे यांना करमाळा येथील न्यायालयात न्यायाधीश भोसले यांच्यासमोर हजर केले.

 सरकारी वकील सचिन लुणावत यांनी आरोपींना दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायाधीश भोसले यांनी १२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

खुनाचे कारण शोधण्यासाठी कस्टडी

तिसरी आरोपी महिला असून, तिला अटक करावयाची आहे. खून कोणत्या कारणाने केला, कधी खून केला, कपडे जप्त करून मृतदेह कसा आणला, कार कशी पेटवली, रस्त्यावरील फुटेज तपासायचे असल्याने पोलिसांकडून दहा दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments