google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपरिषद अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी

Breaking News

सांगोला नगरपरिषद अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी

 सांगोला नगरपरिषद अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी


   सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)     केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा (PMFME)

 लाभ घेऊन सांगोला शहरातील युवक, शेतकरी, शेतकरी कंपन्या, उत्पादन संस्था, स्वयंसहाय्यता गटांना प्रक्रिया उद्योग सुरू करता येतो. 

 या माध्यमातून शेतमालाला चांगला भाव मिळेल आणि शासकीय अनुदानही मिळेल. 

 त्यामुळे सांगोला शहरातील ( नगरपरिषद हद्दीमधील ) जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेणेसाठी शहर अभियान व्यवस्थापन कक्ष 

( NULM ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. सुधीर गवळी , मुख्याधिकारी, नगरपरिषद सांगोला यांनी केले आहे. 

 केंद्र शासनाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना देशभरामध्ये राबविण्याचे नियोजन केलेले असून सन 

२०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षासाठी ही योजना राबविली जात आहे. सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे

 वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट/संस्था/कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक गट यांची पतमर्यादा वाढविणे, 

उत्पादनांचे ब्रँडींग व विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे, 

अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी सहाय्य करणे, सामाईक सेवा जसे साठवणूक, 

प्रक्रिया सुविधा, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे, 

अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे तसेच सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांनी 

व्यावसायिक व तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करणे हे योजनेचे मुख्य उद्देश आहेत. कोणास मिळेल लाभ

१.या योजने अंतर्गत १८ वर्षावरील वैयक्तिक मालकी / भागीदारी, शेतकरी उत्पादक गट संस्था/ कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक संस्था, बेरोजगार युवक, 

महिला, प्रगतशील शेतकरी यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के जास्तीत जास्त १० लाखपर्यंत क्रेडीट लिंक सबसिडी आधारावर अनुदानाचा लाभ देय आहे.

२. सामाईक पायाभूत सुविधा अंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी, स्वयंसहाय्यता गट आणि त्यांचे फेडरेशन / शासकीय संस्था भाग धेवु शकतात.

 सदर घटकासाठी ३.०० कोटी कमाल मर्यादेसह पात्र  प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के क्रेडीट लिंक कॅपिटल सबसिडी देय आहे.

३.बचत गटातील सदस्यांना बीज भांडवल अंतर्गत खेळते भांडवल किंवा गुंतवणीकरीता रक्कम रु.४००००/- प्रति सदस्य ( प्रति बचत गटास रु.४.०० लाख ) देय आहे.सांगोला नगरपरिषद हद्दीतील प्रकल्प

        या योजने अंतर्गत पोर्टलवर प्राप्त झालेले प्रकरणे बँकेला सादर करण्यात आली असून बँकेव्दारे कर्ज  वितरण होवून पापड तयार करणे, 

शेवाळ्या तयार करणे, अशा विविध प्रक्रिया वर आधारित उत्पादने घेण्यास लाभार्थ्यांनी सुरुवात केली आहे. आतापर्यंत रक्कम रुपये ३३ लाख ६४ हजार मात्र मंजूर केली आहे.

 त्यापैकी रक्कम रुपये १३ लाख ३८ हजार मात्र लाभार्थ्यांच्या खाते वर वितरीत करणेत आलेले आहे. यामध्ये बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, लोकमंगल को- ऑप. बँक शाखा – सांगोला यांनी सहकार्य केले.

सदर कार्यक्रमास श्री संजय खडतरे, तहसीलदार व डॉ.सुधीर गवळी, मुख्याधिकारी नगरपरिषद सांगोला यांचे हस्ते 

लाभार्थीना  PMFME योजने अंतर्गत धनादेश वाटप केले.यावेळी प्रविण भोसले, मॅनेजर, लोकमंगल बँक आणि नगरपालिकेचा अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments